मुंबई: अॅपलचा नवा स्मार्टफोन आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉननं आयफोन 7 आणि 7प्लसवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आणली आहे.


या ऑफरमध्ये ग्राहकांना थेट 10 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. मागील आठवड्यात फ्लिपकार्टनं अशीच सूट दिली होती. त्यानंतर आज अमेझॉननं त्यापेक्षाही अधिक सूट दिली आहे.

या सेलमध्ये आयफोन 7 आणि 7प्लससोबत आयफोन 6चा 32 व्हेरिएंटचीही विक्री सुरु आहे.

ऑफरनंतर आयफोन7 ची किंमत किती?

iPhone 7 32 जीबी स्मार्टफोनवर 10 हजारांची सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन आता 49,999 रुपयात मिळणार आहे. या स्मार्टफोनची सध्याची किंमत 60,000 रुपये आहे.

iPhone 7 128 जीबी स्मार्टफोन फक्त 59,999 रुपयात मिळणार आहे. ज्याची किंमत 70,000 रुपये आहे.

iPhone 7 256 जीबी स्मार्टफोनवर देखील 10 हजारांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन 70,215 रुपयात उपलब्ध आहे. सध्या याची किंमत 80,000 रुपये आहे.

ऑफरनंतर आयफोन 7प्लसची किंमत किती?

iPhone 7 प्लस 32 जीबी स्मार्टफोनवर 10 हजारांची सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन आता 61,999 रुपयात मिळणार आहे. या स्मार्टफोनची सध्याची किंमत 72,000 रुपये आहे.

iPhone 7 प्लस 128 जीबी स्मार्टफोन 71,999 रुपयात मिळणार आहे. ज्याची किंमत 82,000 रुपये आहे.

दरम्यान या सेलमध्ये iPhone 7 प्लसच्या  256 जीबी स्मार्टफोनवर कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही.