मुंबई : आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पत्रानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवर अडचणीत आल्याचे पहायला मिळाले. माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. तत्पूर्वी, माझ्या खात्याकडून कसलीही सूचना एमपीएससीला केली नसल्याचा खुलासा मंत्री वडेट्टीवार यांनी ट्वीटरवरुन केला होता. पण, लगेच ते ट्वीट डिलीट करत नव्याने हे ट्विट करण्यात आलाय. संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊया.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं स्पष्टीकरण आयोगाचा निर्णय एकटा सचिव किंवा सहसचिव घेत नाहीत. शासनाने आम्हाला (MPSC) काल एक लेखी पत्र पाठवलं त्यावर आम्ही शासनाने पाठवलेल्या लेखी पत्राची अंमलबजावणी करत हे आजचं परिपत्रक काढलं आहे. हा निर्णय आपत्ती निवारण विभागाने दिला असून याला मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर हा निर्णय लेखी पत्राद्वारे घेण्यात आला असल्याचे आयोगाने सांगितले आहे.
अन् वडेट्टीवार यांनी ट्वीट डिलीट केलंएमपीएससीकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानंतर एबीपी माझाने बातमी दिली होती. याच बातमीचा स्क्रिन शॉट ट्वीटर वर शेअर करत आपल्या अखत्यारीतील आपत्ती व्यवस्थापन विभागाने एसपीएससीला कसलीही सूचना केली नसल्याचा खुलासा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. याचवेळी वृत्त्त वाहिन्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी विरोधी पक्षाद्वारे पसरविण्यात येत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवून बातमी देऊ नये किंवा तपासणी करून बातमी द्यावी, असं मंत्री वडेट्टीवार यांनी लिहलं होतं. मात्र, एमपीएससीच्या पत्रातचं उल्लेख असल्याने वडेट्टीवार यांनी ते ट्विट डिलीट केलं.
मला अंधारात ठेऊन निर्णय : वडेट्टीवार आधीचे ट्वीट डिलीट केल्यानंतर वडेट्टीवार पुन्हा एकदा ट्विट डिलीट करत "माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काहीही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
एमपीएससीकडून खुलासा मंत्री वडेट्टीवार यांच्या ट्विटनंतर एमपीएससीकडून सुद्धा हेच संगितले आहे की हा निर्णय सचिव स्तरावर आणि मुख्यमंत्री यांच्या परवानगीने झाला आहे. यासाठी त्या विभागाच्या मंत्र्याशी बोलणे झाले किंवा त्यांना अशी कल्पना आहे की नाही याबाबत माहिती नाही. त्यामुळे परिपत्रकात त्या विभागाचे नवा नमूद केले गेले आहे.
निर्णयाचा फेरविचार करा : मंत्री विजय वडेट्टीवार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे स्वतः कोविड पॉझिटिव्ह असून ब्रिच कॅण्डी रुग्णालय मुंबई येथे उपचाराकरिता गेल्या पाच दिवसापासून भरती आहेत. पुणे येथे विधार्थ्यांचे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वतः व्हिडीओव्दारे माहिती दिली.