Navadevi Waterfall : पावसाळा (Rainy Seasion) सुरु झाला की, अनेक धबधबे ओसंडून वाहू लागतात. त्यामुळे पर्यटक देखील सुट्टीचा आनंद घालविण्यासाठी धबधब्यांवर येत असतात. धुळे जिल्ह्यातील नवादेवी धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. शिरपूर (Shirpur) तालुक्यातील बोराडी पासून 10  किलोमीटर अंतरावर कोडीद गावाजवळ “नवादेवी धबधबा” हा वन डे मॉन्सून डेस्टिनेशनच्या शोधात असणाऱ्या पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय म्हणून परफेक्ट असल्याचे पर्यटकांकडून सांगण्यात येत आहे. 


सातपुड्याच्या पायथ्याशी आणि  मध्यप्रदेश राज्याच्या (Madhyapradesh) सीमेलगत असलेल्या गावाची वस्ती आहे. त्यातील सातपुड्याच्या (Satpuda) डोंगरांच्या येणाऱ्या प्रवाहातून येणाऱ्या सरींमुळे विविध ठिकाणी धबधबा सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या धबधब्याकडे पर्यटकांची पाऊले वळू लागली आहेत. तालुक्‍याच्या पर्यटनात नवादेवी, धाबादेवी (Navadevi Watrefall) या धबधब्याची मोहक दृश्य पर्यटकांना भुरळ घालणारे आहेत. वन पर्यटनाने समृद्ध हे ठिकाण असल्याने येथे गर्दी होत आहे. मध्यप्रदेशसह शिरपूर तालुक्यातील तसेच शहादा, जळगाव, नरडाना येथील मोठ्या संख्येने पर्यटक येथे रोज येत आहेत. कोडीद, नवादेवी रस्त्याच्या मधोमध चारचाकी आणि दुचाकी वाहने लावून पर्यटक धबधब्याकडे जात आहेत.


अशा निसर्गरम्य वातावरणात पावसाळी पर्यटनाचा (Rainy Tourism) आनंद काही औरच आहे! आणि त्यातही धबधब्याखाली चिंब भिजायला कुणाला आवडणार नाही? त्यासाठीच पावसाळी पर्यटनासाठी त्यातल्या त्यात योग्य वातावरण आणि योग्य ठिकाणाचा शोध हौशी पर्यटकांकडून घेतला जात आहे. अशा या उष्ण वातावरणातही पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायला सुरुवात केली आहे. शिरपूर तालुक्यातील बोराडी पासून 10 किलोमीटर अंतरावर कोडीद गावाजवळ “नवादेवी धबधबा” हा वन डे मॉन्सून डेस्टिनेशनच्या शोधात असणाऱ्या पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय म्हणून परफेक्ट आहे. धुळे (Dhule) आणि जळगाव, नंदुरबार परिसरातील पर्यटक सध्या वन डे पिकनिकसाठी "नवादेवी” धबधब्याला मोठ्या संख्येने भेट देत आहेत.


निसर्गप्रेमींसाठी नवादेवी धबधबा हा उत्तम पर्याय


गेले काही दिवस धो धो बरसणारा पाउस सुरु असल्याने नवादेवी धबधबा सध्या प्रवाहित झाला आहे. अशा वातावरणातही सातपुड्याच्या  हा भाग सर्वत्र दाट वनराई आणि त्यात डोंगराच्या अगदी पायथ्याला अगदी शांत आणि निसर्गरम्य वातावरणातील हा नवादेवी धबधबा सध्या निसर्गप्रेमी पर्यटकांना चांगलाच आकर्षित करतांना दिसत आहे. नवादेवी परिसर हा पावसाळयात नेहमीच पर्यटकांसाठी सुखावह पर्यटनाचा आनंद देणारा परिसर आहे. गेले काही दिवस मनसोक्त बरसणाऱ्या पावसाने सातपुडा परिसरात सर्वत्र हिरवेगार गालिचे आणि बहारदार हवा अनुभवायला मिळत आहे. पावसाळी पर्यटनस्थळाच्या शोधात असलेल्या निसर्गप्रेमींसाठी नवादेवी धबधबा हा उत्तम पर्याय असून सेंधवा, शहादा, धुळे इथल्या पर्यटकांसोबतच चोपडा आणि परिसर त्याचबरोबर स्थानिक बोराडी, शिरपूर परिसरातील पर्यटकही या धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतांना दिसत आहेत.



कसे पोहचाल धबधब्यापर्यंत? 


शिरपूरने येणारा वाघाडी मार्गाने बोराडी गावात प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या डाव्याबाजूला 10 ते 11 किलोमीटर जाऊन कोडीद गेल्यावर हनुमान मंदिराच्या उजवीकडे वळल्यावर गावापासून 8 किलोमीटरवर नवादेवी धबधबा आपल्या स्वागतार्ह बहारदारपणे दिमाखात ओसंडत आहे. ‘नवादेवी’ धबधबा, सध्या येथे सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण दिसत आहे. शनिवार आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होतांना दिसत आहे. पर्यटकांचे पाय आपोआप नवादेवी धाब्याकडे  वळतात. या धबधब्यापर्यंत सुरक्षित जायला आणि तसेच निसर्गरम्य पर्यटनाची माहिती द्यायला स्थानिक नागरिकांची मदत मिळत आहेत. तसेच शासनाने या निसर्गरम्य पर्यटकांचा विकास केला तर नक्कीच या भागातील आदिवासी कुटुंबांना रोजगार मिळेल. उन्हाळ्यात जरी कमी रोजगार मिळाला तरी पावसाळ्यात मात्र, ही कसर भरून निघेल असं पर्यटनतज्ज्ञाकडून सांगण्यात येत आहे.


 


इतर संबंधित बातम्या : 


Dhule Shirpur : शिक्षणाची दैना! सर्व शिक्षण अभियान कुठंय? धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात चौदा शाळा झोपडीत भरतात!