Dhule News धुळे :  देशातील वाढती सांप्रदायिकता, धमांधता, अन्यायाविरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मणिपूर ते मुंबई 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyay Yatra) प्रारंभ केली आहे. आपण सर्वांनी त्यांच्या प्रयत्नांना बळ द्यायला हवे. भाजप (BJP) सक्षम नसल्यानेच ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबाव टाकत आहे. तसेच इतर पक्षांतील आमदार, खासदार फोडून सत्ता मिळवण्यासाठी खटाटोप करीत आहे. त्यांना देशाच्या विकासापेक्षा सत्ता महत्वाची आहे. 


या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Elections 2024) महत्त्वाच्या असून आम्ही महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) माध्यमातून या निवडणुकांसाठी (Elections) सज्ज झालो आहोत. आम्ही एकजुटीने या निवडणुका लढू व जिंकू, असा निर्धार आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत 27 जानेवारी रोजी धुळ्यात (Dhule News) होणाऱ्या नाशिक विभागीय बैठकीच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. 


27 जानेवारीला काँग्रेसचे बडे नेते धुळ्यात


पक्षातील ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे या मान्यवरांसह सर्व प्रदेश उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस आणि पाचही जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत.


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक


यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत २७ रोजी धुळ्यात होणान्या नाशिक विभागीय बैठकीबाबत माहिती दिली. गोंद येथील साईलक्ष्मी लॉन रिसॉर्ट येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ही बैठक होईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असून यात विभागातील पाचही जिल्ह्यांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


जागावाटपाचा फॉर्मुला आज ठरणार?


लोकसभा जागावाटपासंदर्भात मुंबईत आज गुरुवारी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीतून काढता पाय घेतल्यामुळे आज होणाऱ्या महाराष्ट्रातील बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Nashik Weather Update : नाशिक, धुळ्यात हुडहुडी! निफाडला निचांकी तापमान; द्राक्ष बागायतदार चिंतेत


Chandanpuri Yatrotsav 2024 : चंदनपुरीच्या खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ; 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोष दुमदुमले 'प्रति जेजुरी'