Shirpur ATM Robbery : धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील (Shirpur) बोराडी येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (Bank Of India) समोरील एसबीआय बँकेचे एटीएम (ATM Robbery) आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीन फुटत असल्याचे मुंबई येथील कार्यालयात कळताच त्यांनी तात्काळ शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात आणि गावातील नागरिकांना कळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. 


शिरपूर तालुक्यातील बोराडी बस स्थानकाजवळील (Boradi Bus Stand) भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या समोरील एटीएम मशीन पहाटेच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तींनी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. एटीएम मशीन रुममध्ये प्रवेश करण्याआधी चोरट्यांनी बाहेरील आणि आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काळ्या रंगाचा स्प्रे मारला. एटीएम मशीन रुममध्ये प्रवेश करतांना हातात छत्री घेऊन चेहरा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच एटीएम मशीन फोडण्यासाठी कटरसारख्या हत्याराच्या साहाय्याने एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सर्व मुंबई (Mumbai)  येथील कार्यालयात कळताच त्यांनी तात्काळ शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात आणि गावातील नागरिकांना कळल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
         
बोराडी बस्थानकाजवळ असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला  आहे. फोडण्यासाठी आलेल्या चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. चोरट्यांनी लाल व काळया रंगाचा शर्ट घातला आहे. एकाच्या हातात छत्री व दुसऱ्याच्या हातात काळ्या रंगाचा स्प्रे व एटीएम मशीन फोडण्यासाठीचे साहित्य असल्याचे दिसून येत आहे. दोघांनी तोंडाला मास्क लावले होते. मात्र एटीएममध्ये चोरी होत असल्याचा प्रकार मुंबई येथील शाखेत कळताच पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलिस येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी धूम ठोकली. एसबीआयचे एटीएम मशीन फोडण्याचे दुसऱ्यांदा प्रयत्न केला आहे.


अन्य सीसीटीव्हीचे फुटेजचे संकलन सुरू


दरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे दुपारीच या एटीएममध्ये पैसे टाकण्यात आले होते. लागलीच पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेच्या मुंबई कार्यालयाच्या समयसूचकतेने हा प्रयत्न फसला. पोलीस येत असल्याचे कळल्यावर त्यांनी एटीएममधून पळ काढला. त्यामुळे एटीएममधील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. एटीएम मशीन फोडण्याची घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, सदिप पाटील, कैलास, योगेश मोरे, सुरेश ठाकूरसह पथकाने भेट देऊन पाहणी केली. व पुढील तपास करण्यासाठी गावातील इतर सीसीटीव्ही कॅमेराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चोरट्यांना जेलबंद करण्यासाठी पथक तपास करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत दाखल करण्याचे काम सुरू होते.


ही बातमी वाचा: