Dhule Latets News update: धुळे शहरात गोवरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून गोवर बाधित रुग्णांची संख्या 66 वर गेल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. शहरातील ज्या भागात गोवरचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत, त्या भागात महापालिकेकडून नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. एकाच दिवशी गोवरचे 34 बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. 

 

गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात गोवरचे रुग्णसंख्या वाढत आल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्रात हे प्रमाण अत्यल्प असल्याने काळजी करण्यासारखे कारण नसल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र तरीदेखील प्रत्येक वस्ती, गल्लीत, वाडे गाव आदी ठिकाणी गोवरचे लसीकरण करण्यात येत आहे. असे असताना धुळे जिल्ह्यात एकाच दिवशी गोवरचे 34 बाधित रुग्ण आढळून आल्याने खलबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर धुळे आरोग्य प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. 

 

धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून गोवर या साथीच्या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली असून शहरात सध्या 341 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 66 वर गेली असून एकाच दिवसात तब्बल 34 गोवर बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील मुस्लिम बहुल भागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून नंदी रोड हजार खोली या परिसरात गोवरचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या गोवर मातीत रुग्णांमध्ये बालकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून या बालकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाला दिली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गोवरला आळा घालण्यासाठी लसीकरणासह विविध उपाय राबविले जात आहेत, शहरातील ज्या भागात संस्थेत रुग्ण आढळून येत आहेत. त्या भागात महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे. लसींचा तुटवडा गेल्या काही दिवसांपूर्वी निर्माण झाला होता. मात्र गोवर बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लसींचा साठा उपलब्ध झाल्याने हे लसीकरण पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. शहरातील ज्या भागात गोवरचे सर्वाधिक वृद्ध आढळून येत आहेत त्या भागात महापालिकेकडून नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे.

 

आरोग्य यंत्रणा सतर्क

मागच्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात गोवरची रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबईतील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान मुंबई पाठोपाठ आता नाशिक, मालेगावनंतर धुळ्यातही  गोवरच्या साथीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे धुळे आरोग्य यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. दरम्यान धुळे शहरात काल एका दिवसांत 34 गोवर बाधित रुग्ण पहिल्यांदाच आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.