Dhule Factory Explosen : धुळे शहराजवळ असलेल्या अवधान एमआयडीसीमधील एका कंपनीत मोठा स्फोट झालाय. संजय सोया ओईल या कंपनीत आज 7.30 वाजण्याच्या सुमारास स्फोट झालाय. ऑईलच्या टाकीजवळ वेल्डिंगचे काम सुरू असतानाच अचानक स्पोट झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलवणार, पालकमंत्र्यांची माहिती
अधिकची माहिती अशी की, संजय सोया ऑइल कंपनीमध्ये आज सायंकाळच्या सुमारास एका टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑइल साठवण्यात आले होते. त्याच टाकीजवळ वेल्डिंगचे काम सुरू असल्याची माहिती कामगारांकडून मिळाली आहे. याच दरम्यान स्फोट झाला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. एमआयडीसीमधील घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री जयकुमार रावल यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली. घटनेतील जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलवणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिलीये.
धुळ्यातील अवधान एमआयडीसी मध्ये असलेल्या संजय सोया ऑइल या कंपनीत स्पोट; आगीत एकाचा मृत्यू
धुळे शहराजवळ असलेल्या अवधान एमआयडीसी मधील संजय सोया ओईल या कंपनीमध्ये आज साडे सात वाजेच्या सुमारास ऑईलच्या टाकीजवळ वेल्डिंगचे काम सुरू असतानाच अचानक स्पोट झाला आणि या स्फोटात 1 कामगाराचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे....आज सायंकाळच्या सुमारास संजय सोया ऑइल कंपनीमध्ये ज्या टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑइल साठवण्यात आले होते त्याच टाकीजवळ वेल्डिंगचे काम सुरू असल्याची माहिती कामगारांकडून मिळाली आहे आणि याच दरम्यान स्फोट झाला आहे... या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे....
इतर महत्त्वाच्या बातम्या