Dharashiv : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन दिवसांवर लग्न असतानाच विजेचा शॉक लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जाकेपिंपरी इथं ही घटना घडली आहे. भैरवनाथ लांडगे असं मृत युवकाचे नाव आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, 22 जून रोजी भैरवनाथचा विवाह संपन्न होणार होता. मात्र, तत्पूर्वीच विद्युत पोलच्या लाईनवरील स्विच बदलताना शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

Dharashiv Crime: ऑनलाईन रमीत पैसे हरला, कर्जबाजारी तरुणाने पत्नी अन् मुलाला विष पाजलं, नंतर स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला, धाराशिव हादरलं