धाराशिव: तुळजाभवानी देवीच्या (Shree Tulja Bhawani Temple) दर्शन व्यवस्थेबाबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण नसताना काही जण पुजाऱ्यांवर दबाव आणत आहेत, असे वक्तव्य नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केली आहे. नवरात्रीनिमित्त (Navratri 2023) नीलम गोऱ्हे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजापूरला दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना नाराजी व्यक्त केली आहे.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, राज्य सरकारने जिल्हाधिकारी यांना नियम व अंमलबजावणी बाबत सूचना दयायला हव्यात . कारण नसताना काही जण पुजाऱ्यांवर दबाव आणत आहेत, हीन दर्जाचे राजकारण सुरु आहे, ते चुकीचे आहे. देवी प्रत्येकाचा हिशोब करत असते.
या अगोदर देखील नीलम गोऱ्हे यांनी महिलांना देवीची आराधना करण्याची परवानगीविषयी नाराजी व्यक्त केली होती. सामान्य महिलांना तर नाहीच, परंतु मलाही आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला होता, हा दुजाभाव आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.
तुळजाभवानीच्या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी
चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाच्या उत्सवांपैकी शारदीय नवरात्र विशेष महत्त्वाची मानली जात असून, महाराष्ट्रात देवीचा उत्सव फार मोठा आहे. त्यामुळे सगळीकडेच नवरात्रोत्सवाची रेलचेल पाहायला मिळत असते. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने साजरा केल्या जाणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवासाची एक विशेष ओळख आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.
18 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, रथ अलंकार महापूजा व रात्री छबीना
19 ऑक्टोबर : "ललिता पंचमी" देवीची पूजा, मुरली अलंकार महापुजा व रात्री छबीना
20 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, शेषशाही अलंकार महापुजा व रात्री छबीना
21 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, भवानी तलवार अलंकार महापुजा व रात्री छबीना
22 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा, दुपारी 3 वाजता वैदिक होम व हवनास आरंभ, रात्री 8.10 वाजता पुर्णाहुती, रात्री छबीना
23 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, दुपारी 12 वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग व संत जानकोजी भगत बुन्हाणनगर येथून येणारे पालखीची मिरवणूक
24 ऑक्टोबर : विजयादशमी (दसरा) उषःकाली देवीची शिबिकारोहन, सिमोल्लंघन मंदिराभोवती मिरवणूक, मंचकी निद्रा, शमीपुजन व सार्वत्रिक सिमोल्लंघन
28 ऑक्टोबर : कोजागिरी पौर्णिमा
29 ऑक्टोबर : पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, नित्योपचार पूजा व रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबीना व जोगवा
30 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद व रात्री सोलापूरच्या काठयांसह छबीना.