धाराशिव: धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा कार्यकर्त्याचं आंदोलन सुरू आहे. धाराशिवमधील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला कोंडून घेऊन मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे. जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयात मराठा आंदोलक घुसले आहेत. त्यांनी कार्यालयात स्वतःला कोंडून घेऊन आंदोलन केलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या उपोषणानंतर आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. जिल्हा अधिकारी सचिन ओंबासे कार्यालयाबाहेर आहेत, जिल्हाधिकारी सचिन ओंबासे आणि पोलीस फाटा कार्यालयाबाहेर बसल्याचं दिसून येत आहे.
गेल्या अर्धा एक तासापासून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला कोंडून घेतलं आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर मराठा आंदोलन नाराज झाले आहेत. त्यामुळे या आरक्षणाच्या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी मराठा समाजाच्या या आंदोलकांनी केली आहे. त्यानंतर त्यांनी धाराशिव मधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दंडाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये त्यांनी स्वतःला बंद करत आंदोलन सुरू केले आहे. जवळपास दहा ते बारा पोलिसांचा फौज फाटा कार्यालयाच्या बाहेर थांबला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलन मात्र मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करत आहेत. ते आंदोलनावर ठाम आहेत. कार्यालयातील सीसीटीव्ही च्या माध्यमातून पोलीस त्यांच्यावर देखरेख ठेवत आहेत.
मनोज जरांगे यांचं आंदोलन
मराठा आरक्षणासह आपल्या इतर मागण्यांसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करत आंदोलन सुरू केलं आहे. आज त्यांच्य आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. मस्साजोगचे सरपंच दिवगंत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख उपोषणात सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता धाराशिवमधील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला कोंडून घेऊन मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे.
मनोज जरांगे यांनी पाणी पिलं
मनोज जरांगे यांनी मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या आईकडून एक ग्लास पाणी पिले. देशमुख कुटुंब जरांगे यांच्या भेटीला अंतरवालीमध्ये दाखल झाले असून मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या आई तसेच मुलगी वैभवी देशमुख यांनी आग्रह केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पाणी पिले आहे.