Dharashiv kunbi certificate: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी छेडलेलल्या आंदोलनानंतर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशही राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील आठ गावांना कुणबी प्रमाणपत्रासाठी ताटकळावे लागणार आहे . धाराशिव जिल्ह्यातील या गावांमध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद गॅझेटऐवजी सातारा गॅझेटचा संदर्भ घ्यावा लागणार आहे .

Continues below advertisement

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मागणीनुसार, राज्य सरकारने  हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याचं जाहीर केलं आहे. त्या संबंधित जीआर (Government Resolution GR) देखील काढण्यात आला. मराठवाड्यासाठी (Marathwada Region) हैदराबाद गॅझेटियर (Hyderabad Gazetteer) महत्त्वाचं आहे. कारण मराठवाडा हा स्वातंत्र्यापूर्वी निझामाचा प्रांत होता. त्यामुळे त्याच्या ऐतिहासिक नोंदी या निझामाच्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये (Hyderabad Gazetteer Records) मिळतात.

नेमकं प्रकरण काय ?

धाराशिव जिल्ह्यातील आठ गावांमध्ये आता हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीत . आंबेजवळगा, कवडगाव, येडशी, जवळा, दुधगाव, कसबे तडवळा, गोपाळवाडी, कोंबडवाडी या गावांचा यात समावेश आहे .  1982 पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील या आठ गावांचा समावेश सोलापूर जिल्ह्यात होत होता .त्यानंतर ही गावं धाराशिव जिल्ह्यात समाविष्ट झाल्याने कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदींसाठी  अडचण निर्माण झाली आहे .  सोलापूर जिल्ह्यात समावेश होत असल्याने आता या आठही गावांमधील कुणबी नोंदणी शोधण्यासाठी सातारा गॅझेटचा संदर्भ घ्यावा लागणार आहे . हैदराबाद गॅझेट मध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांची माहिती असून सातारा गॅजेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आहे .

Continues below advertisement

कसबे तडवळा शाळेत मोडी लिपीतील पुरावे

या संदर्भातील महत्त्वाचे सर्व पुरावे मोडी लिपीत उपलब्ध असून धाराशिव मधील कसबे तडवळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या नोंदीत हे दस्तऐवज असल्याची माहिती मिळाली आहे . कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर याविषयी माहिती स्पष्ट करून जनजागृती करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत .

कोणत्या गावांचा समावेश ?

आंबेजवळगा, कौडगाव, येडशी, दुधगाव, कसबे तडवळा, गोपाळवाडी आणि कोंबडवाडी ही आठ गावे यामध्ये समाविष्ट आहेत .या गावांचा 1982 पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच सोलापूर जिल्ह्यात समावेश होता .त्यामुळे कुणबी नोंदणीसाठी सातारा गॅजेटचा आधार घ्यावा लागणार आहे .

मराठा आरक्षणासाठी गॅझेटियर का महत्त्वाचे?

गॅझेटियर्समध्ये अनेक ठिकाणी मराठा आणि कुणबी समाजाविषयी ऐतिहासिक नोंदी आहेत. सातारा आणि कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठाकुणबी यांच्यातील समानता, विवाह, शेतकरी जीवन याबद्दल नोंदी आहेत. त्यामुळे गॅझेटियर हे केवळ भूगोलइतिहास नसून, आजच्या आरक्षण आणि सामाजिक वादांमध्ये महत्त्वाचा पुरावा ठरतो.