Dharashiv Crime News : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील पळसप गावात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. महाराजांच्या भक्तीवरून झालेल्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत लाकाळ (वय 55) असून त्यांचा मुलगा वैभव लाकाळ (अविवाहित) हा रामपाल महाराजांचा कट्टर भक्त असल्याचे सांगितले जाते. चंद्रकांत लाकाळ यांना मुलाच्या अंधश्रद्धापूर्ण भक्तीचा व महाराजांच्या नादी लागण्याचा विरोध होता. यावरून वडील व मुलामध्ये अनेकदा वाद व्हायचे.

8 ऑगस्ट रोजी झालेल्या एका वादातून हा वाद चिघळला आणि रागाच्या भरात वैभवने आपल्या वडिलांच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत चंद्रकांत यांना तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलगा वैभवला अटक केली. गावात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोटच्या पोराने केवळ भक्तीविषयीच्या मतभेदातून वडिलांचा जीव घेतल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत लाकाळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मुलाचे नाव वैभव लाकाळ असे आहे. वैभवने त्याच्या वडिलांच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने वार केला. या हल्ल्यानंतर चंद्रकांत लाकाळ यांचा मृत्यू झाला. रामपाल महाराज यांच्या भक्तीला विरोध केल्याने पोटच्या पोराने जन्मदात्या वडिलांची हत्या झाल्याचे म्हटले जात आहे, ही घटना धाराशिवमध्ये घडली आहे.  

हे ही वाचा -

Kapil Sibal On Jagdeep Dhankhar : अन्यथा कोर्टात जाणार! 'लापता लेडीज' बद्दल ऐकलं होतं, पण 'लापता' उपराष्ट्रपती पहिल्यांदाच ऐकतोय, तडकाफडकी राजीनाम्यानंतर जगदीप धनखड गायब, थेट अमित शाहाकंडे विचारणा

Rahul Gandhi on Election Commission:'मत चोरी' बद्दल तक्रार करण्यासाठी वेबसाईट लाँन्च आणि मिस्ड कॉल नंबर सुद्धा जारी केला; राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई सुरु