Dharashiv Crime News : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, अनैतिक संबंधातून 27 वर्षीय तरुणाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. कळंब तालुक्यातील ईटकूर येथील घटना असून, प्रेयसीच्या पतीला आपल्या प्रेमाची माहिती मिळाल्याने आरोपीने ही हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. राहुल रणजित फरताडे (वय 27 वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरेश फरताडे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन सुरेशला वाशी पोलिसांनी गजाआड केले असून, त्याने खुनाची कबुलीही दिली आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हा 30 जूनच्या रात्री पार्टीसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही. दरम्यान, 11 वाजण्याच्या सुमारास राहुल याचा मृतदेह मांडवा शिवारात पडला असल्याचा फोन त्याच्या वडिलांना आला. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाठोपाठ वाशी पोलीसही तिथे पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह वाशीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. या घटनेप्रकरणी राहुलचे वडील रणजित फरताडे यांच्या तक्रारीवरुन अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


दरम्यान वाशी पोलिसांनी लागलीच तपासाचे चक्र फिरवले. खून झाला असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरु केला. पोलिसांच्या तपासात हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, सुरेश फरताडेचे नाव समोर आले. त्यामुळे पोलिसांनी संशयावरुन मृत राहुल याची पत्नी आणि सुरेश फरताडे या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सुरेश फरताडे याने खून केल्याची कबुली दिली. 


खुनाची कबुली दिली


पोलिसांनी सुरेश फरताडेला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने आपणच खून केला असल्याची कबुली दिली. तर मयत राहुल हाच आपला खून करणार होता, अशी माहितीही त्याने पोलिसांना दिली. त्याच्या पत्नीशी आपले अनैतिक संबंध असल्याचे राहुलला माहित झाले होते. यामुळे तो आपला जीव घेणार असल्याने त्याच्याआधी आपणच काटा काढण्याचे ठरवले. शुक्रवारी (30 जून) त्याच्यावर लक्ष ठेवत मांडवा शिवारात एकटे गाठून खून केल्याचीही माहिती आरोपीने पोलिसांना दिली.


नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 


दरम्यान राहुल फरताडे याची हत्या झाल्याची माहिती काही वेळात गावात पसरली. तर याची महिती नातेवाईकांना मिळाल्याने त्यांनी रुग्णालयात गर्दी केली. तसेच आरोपीला ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर दुपारी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचे सांगितल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Dharashiv News: एबीपी माझा इम्पॅक्ट; धाराशिवमधील वेठबिगारीच्या बातमीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल