धाराशिव : धाराशिव शहरातील मुख्य भागातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर (Jyoti Kranti Multistate Bank in Dharashiv) पाचच्या सुमारास सशस्त्र दरोडा (Armed robbery) पडला. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बांधून ठेवत दरोडा घातला. सोन्यासह सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल दरोडखोरांनी लंपास केला. या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा घातला गेल्याने खळबड उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरोडेखांचा तपास सुरु केला आहे. सीसीटीव्हीमध्ये 4 आरोपी दरोडेखोर जाताना कैद झाले आहेत. 


जिल्हा स्टेडियमच्या जवळ असलेल्या सुनील प्लाझामधील ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही बँक दिवसाढवळ्या लुटण्यात आली. घटना घडताच बँक कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्याशी संपर्क साधून सदर घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलिस तिथे आले.


तुळजाभवानी अलंकार गहाळप्रकरणी अखेर 7 जणांवर गुन्हा दाखल


दरम्यान, धाराशिवमधील (Dharashiv) येथील तुळजाभवानी (Tulja Bhavani) मातेचा बहुचर्चित प्राचीन व मौल्यवान अलंकार गायब प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सात पैकी पाच जण मयत आहेत. तुळजाभवानी मातेच्या अलंकार चोरी प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटले होते. तुळजाभवानी मातेचे प्राचीन व मौल्यवान अलंकार गायब प्रकरणी आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट व इतर दागिने गहाळ झाले आहेत, या प्रकरणी कारवाईची त्यांनी मागणी केली होती. यावर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तत्परतेने शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधले होते.


इतर महत्वाच्या बातम्या