Dhananjay Munde on Jitendra Awhad : अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय.शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता,जनता तुम्हाला तुमची औकात दाखवेल, असे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. दरम्यान, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पवारांच्या कुटुंबात तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नका, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

Continues below advertisement

अजित पवार (Ajit Pawar) यांचा रांगडा स्वभाव जितेंद्र आव्हाडांना माहिती आहे. त्यांना अचानकपणे या गोष्टीचा विसर पडलाय. अजित पवार (Ajit Pawar) कोणाच्याही मरणाचा दुरान्वये विचार करणार नाहीत. अजित पवार जे बोलले त्याचा विपर्यास करून जितेंद्र आव्हाड सहानुभूती मिळवत आहेत. याउलट आव्हाडच असा हीन विचार करत आहेत, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  म्हणाले,"तुम्हाला साहेबांनंतर पक्ष पूर्ण ताब्यात घ्यायचा आहे. शरद पवार आमच्यासाठी कायम दैवत आहेत. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे बंद करा. पवारांच्या कुटुंबात तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नका. आमच्यासारख्यांचे आयुष्य शरद पवारांना लागू द्या आणि यापुढे असे राजकारण करू नका."

Continues below advertisement

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

अजित पवारांसोबत काम केल्याची लाज वाटते. शरद पवार देशाचे नेते, तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असल घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं कितपत योग्य आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय, जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. 

रोहित पवार यांनी देखील पक्षाचे वाटोळ केलं

ज्या पद्धतीने आव्हाड यांनी पक्षाचं वाटोळं केलं त्याच पद्धतीने रोहित पवार यांनी देखील पक्षाचे वाटोळ केल आहे. रोहित पवार काय रसायन आहे. हे हळूहळू महाराष्ट्राला कळेल, अजित पवार बदलले नाहीत. त्यामुळे त्यांनी याची फारशी काळजी करू नये, असेही धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यावेळी बोलताना म्हणाले. जितेंद्र आव्हाडांपाठोपाठ धनंजय मुंडे यांनी रोहित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Sangli Loksabha : सांगली लोकसभेला महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? कोणत्या पाटलांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार?