Beed :मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आता या प्रकरणात म कोका अंतर्गत कारागृहात असणाऱ्या वाल्मीक कराडच्या वकिलांकडून दोष मुक्तीचा अर्ज करण्यात आलाय. त्यावर आता या प्रकरणातील फिर्यादींनी आपापले म्हणणे न्यायालयाला अर्जाद्वारे मांडले असल्याची माहिती सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
दोषमुक्तीच्या अर्जावर 17 जूनला सुनावणी
वाल्मीक कराडने जो दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे त्याबद्दल फिर्यादींनी आपले म्हणणे दाखल केले असून सीआयडी एसआयटी कडून दोषारूक पत्र दाखल करण्यात आले आहे त्यात खंडणी ते खून हे दोन्ही प्रकरणे एकत्रित आहेत त्यामुळे खंडणीतूनच हा खून झाल्याचे सिद्ध झाले आहे .यारोपिना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असल्याचं फिर्यादींनी आपल्या अर्जात म्हटले आहे .संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुंतलेल्या या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होणार आहे त्यातून कोणीच सुटणार नाही .आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील कठोरातील कठोर शिक्षा व्हावी असेच म्हणणे असल्याचं सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणालेत .
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी बीड येथील विशेष मकोका न्यायालयात अर्ज दाखल केला असून या अर्जावर सुनावणी होणार आहे .नको का कायद्याअंतर्गत असणाऱ्या काही कलमामध्ये आरोपीच्या संपत्तीची जप्ती ही करता येते .त्यामुळे आता 17 तारखेला वाल्मीक कराडच्या संपत्तीच्या जप्तीवर काय निकाल समोर येतो हे महत्त्वाचं राहणार आहे .
वाल्मीक कराडच्या वकिलाने मकोका अंतर्गत दाखल केलेल्या आरोपांपासून मुक्तता मिळावी यासाठी डिस्चार्ज अर्ज दाखल केला होता .या अर्जावर 17 जून रोजी सुनावणी होणार आहे .