Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे पत्र मी अजून वाचलेलं नाही, पण बेपत्ता होणाऱ्या मुली संदर्भात मी आकडेवारी सहित त्याची कारणे दिली आहेत. परत किती येतात हेही सांगितलेला आहे. यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एखादी मुलगी घरून भांडून गेली आणि परत तीन दिवसात आली तरीही आपण कंप्लेंट दाखल करतो, त्यामुळे त्याची संख्या मोठी दिसते. वर्षभरात 90% च्या वर मुली परत आणतो. त्यांनी नेमकं पात्रात काय लिहिले आहे ते मी न वाचल्याने उत्तर देऊ शकणार नाही, मात्र ज्या काही शंका असतील त्यावर मी नक्की उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलीय.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात लहान मुलं आणि मुली पळवण्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहे. यापैकी अनेक मुलांचा पत्ताही लागत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण वाढले असूनही राज्य सरकार किंवा पोलिसांकडून याविरोधात ठोस अशी कोणतीही कृती होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून या प्रकाराबद्दल चिंता आणि संताप व्यक्त केला आहे.त्यावर आता स्वतः मुख्यमंत्र्यानी उत्तर दिलं आहे.
Devendra Fadnavis : आतापर्यंत नागपूर शहारत 12, 460 नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे दिलेत
आजच्या कार्यक्रमात एक हजार नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे वितरित करण्यात आलेत. झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी नवीन धोरण आणले गेले, कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे सर्व प्रकारच्या झोपडपट्टी धारकांना सर्वांना मालकी हक्काचे पट्टे वितरित केले जात आहे. मालकी हक्काचा नागपूर पॅटर्न विकसित करण्यात आला, जो संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलाय. आतापर्यंत नागपूर शहारत 12, 460 नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे दिलेत. या मालकी हक्काच्या आधारावर लाभार्थी मालक झालेत. त्यामूळे लाभार्थ्यांना अधिकृतरित्या बँक लोन किंवा इतर कामासाठी पात्र ठरतायत. अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. ते नागपुरातील कार्यक्रमात बोलत होते.
Devendra Fadnavis : आगामी काळात 50 हजार लाभार्थी होतील
गेल्या 30-40 वर्षात लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे यासाठी संघर्ष केलाय, त्याही वेळेस पट्टेवाटप सुरू केले होते, आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे आम्ही दूर केलेत. आज एक हजार लोकांना मालकी हक्काचे पट्टे दिले, अडीच लाख लोकांना त्याचा फायदा होईल, मालकी हक्काचे पट्टे देणार आहोत, त्याबरोबर सिंधी निर्वासितांना पट्टे देत आहोत. नागपूर मॉडेल आम्ही तयार केला आहे, त्याच्या जीआर आम्ही आता पूर्ण महाराष्ट्राला लागू केला आहे. महाराष्ट्रात जिथे-जिथे झोपडपट्टीत लोक आहेत तिथे एमएमआरडीएमध्ये एसआरए करतो म्हणून त्यांनाही लागू नाही. कोणाचा कच्चा घर असेल तर कोणालाही पक्क घर बांधण्यास अर्थसहाय्य देणार, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आगामी काळात 50 हजार लाभार्थी होतील, आतापर्यंत 25 हजार झाले आहेत, यात वेगवेगळे प्रोसेस असते, ती प्रोसेस सुरू आहे. असेही ते म्हणाले.
फॉर्मुला कुठेच राहणार नाही, जिंकणे हाच फॉर्मुला
कल्याण डोंबिवलीसाठी फक्त 55 जागांची मागणी भाजप का करेल, भाजप महत्त्वाचा पक्ष आहे, त्यांनी अजून कुठली मागणी केली नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये मागच्या वेळेस 42 आमच्या जागा आल्या होत्या, तिथे दोनच प्रमुख पक्ष आहे. एक शिवसेना आणि दुसरा भाजप तिसरा पक्षाचा तिथे काही वजुद नाही, आम्ही आपसात बसून जागा वाटप करू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. फॉर्मुला कुठेच राहणार नाही, जिंकणे हाच फॉर्मुला आहे.