Devendra Fadnavis on Gadchiroli Naxal :आता बंदुकीचा नक्षलवाद (Gadchiroli Naxal) संपत आहे. शहरी नक्षलवाद हेच खरं चॅलेंज आहे. शहरी नक्षलवादी संविधान मानत नाहीत, पण त्यांना बाबासाहेबांचं संविधान हरवेल, अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करु असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलताना व्यक्त केला आहे. गडचिरोलीच्या माओवादविरोधी (Naxal) लढाईत महाराष्ट्र पोलिसांना आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे.

Continues below advertisement

गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) आणि राज्याच्या गृह विभागाच्या संयुक्त कारवाईत माओवादी चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती (Malloujula Venugopal Rao alias Bhupathi) याने आपल्या 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण (Naxalites surrendered) केलं. कुठल्याही रक्तपाता शिवाय 61 माओवाद्यांनी शास्त्र खाली ठेवत पोलीसांपुढे आत्मसमर्पणाचा मार्ग निवडला आहे. गडचिरोलीतील या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे.

Devendra Fadnavis on Gadchiroli Naxal : उत्तर गडचिरोली आधीच सशस्त्र माओवादापासून मुक्त झालाय

भूपती सारख्या अतीवरिष्ठ आणि सुशिक्षित माओवादी, ज्याने आपल्या बौद्धिक गुणांनी संपूर्ण चळवळ उभी करून दाखवली. अशा माओवादी कमांडरला शस्त्रांसह आत्मसमर्पित करून दाखवणं हे देशाच्या इतिहासाची अत्यंत मोठी बाब आहे. उत्तर गडचिरोली आधीच सशस्त्र माओवादापासून मुक्त झाला आहे. दक्षिण गडचिरोलीमध्ये कंपनी 10 चे बोटावर मोजण्याइतके माओवादी शिल्लक आहे आता त्यांनीही आत्मसर्पण करावे, अशी माझी त्यांना विनंती आहे. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. छत्तीसगडमध्ये लवकर मोठे आत्मसमर्पण होईल अशी अपेक्षा आहे, असंही फडणवीसांनी पुढे म्हटलं.

Continues below advertisement

सोनू उर्फ भूपतीचा आत्मसमर्पण अत्यंत महत्त्वाचा आहे. तो पॉलीट ब्युरो मेंबर सेंट्रल कमिटी मेंबर तर आहेच. सोबतच गडचिरोली जिल्ह्यात माओवादी दल निर्माण झाल्यानंतर त्यांना सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण देणारे, बौद्धिक देणारे भूपतीच होते. भूपतीने या संपूर्ण भागात माओवादी चळवळीचा म्होरक्या म्हणून भूमिका बजावली आहे. मोदी सरकारने चोख धोरण राबविले, तीव्रतेने विकास केले आणि दुसऱ्या बाजूला माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास ही प्रोत्साहित केले. भूपतीवर विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे ६ कोटी रुपयांचे बक्षीस होते. छत्तीसगड किंवा तेलंगणामध्ये आत्मसमर्पण करण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत त्याने महाराष्ट्रात पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. गडचिरोली पोलीस आणि गृह विभागाच्या अनेक दिवसांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, या घटनेमुळे गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.

आणखी वाचा