Disha Pardeshi Shared Screenshot: सोशल मीडियावर (Social Media)) होणारं ट्रोलिंग आता सेलिब्रिटींच्या (Celebrity) आयुष्याचा रोजचाच भाग झालाय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कधी कुणासोबत गेलं, काही म्हटलं, काही नवा फॅशन ट्रेंड (Fashion Trend) फॉलो केला तरीसुद्धा ट्रोलिंग ठरलेलं. सातत्यानं होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून अनेकांनी सोशल मीडियाला रामराम ठोकला, तर काहींनी अंतर राखलंय. अनेकजण तर या ट्रोलिंगला कंटाळून मोजकंच बोलतात... पण असेही अनेक सेलिब्रिटी आहेत, जे त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात. असाच काहीसा अनुभव आलाय  एका मराठमोळ्या अभिनेत्रीला. पण अभिनेत्रीनं ट्रोल करणाऱ्याला चांगलंच उत्तर देत फैलावर घेतलं आहे. 

Continues below advertisement


झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'लाखात एक आमचा दादा'मधून (Lakhat Ek Aamcha Dada) घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे, दिशा परदेशी (Dissha Pardeshi). तिनं साकारलेली तुळजा ही भूमिका साऱ्यांनाच आवडली. पण मालिकेच्या मध्यातूनच तिला मालिका सोडावी लागली. यासाठी कारण होतं, तिचं आजारपण. मात्र, आजारातून बरं होऊन तिनं दणक्यात पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मिती क्षेत्रातून आता अभिनेत्री दिशा परदेशी कमबॅक करणार आहे. सध्या ती सोशल मीडियावर सक्रिया असून आपले वैयक्तिक आणि प्रोफेशनल अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच दिशानं तिच्या बिकिनीतील फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले होते. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. पण यामध्ये काही अपवाद होते. काहींनी तिला जोरदार ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अशाच एका ट्रोलरला दिशानं सडेतोड उत्तर दिलं आहे. 




अभिनेत्रीनं ट्रोलरला काय रिप्लाय दिलाय?


अभिनेत्री दिशा परदेशीनं ट्रोलरनं केलेल्या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. या युजरनं दिशाच्या फोटोंवर अत्यंत आक्षेपार्ह्य कमेंट केली. युजरनं कमेंटमध्ये लिहिलेलं की, "महाराष्ट्रात राहायची लायकी नाही तुमची… हिंदू धर्माची आणि मराठी कल्चरची XX XXX टाका, हे देवा आम्हाला काय-काय बघावं लागतंय...", अशा दोन कमेंट्स या नेटकऱ्यानं अभिनेत्रीच्या फोटोंवर केल्या होत्या.



आता याच कमेंटला दिशानं सडेतोड उत्तर दिलंय. युजरच्या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत युजरनं लिहिलंय की, "या माननीय महोदयांना आता काय रिप्लाय देऊ हे मला समजत नाहीये… आपल्याला काही समजत असेल तर मला सांगावं…"


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Gautami Patil Dance Video: मुलांच्या गालावर हात फिरवला, ग्लास पाडले...; 'दिसला गं बाई दिसला'च्या रिमेकमध्ये गौतमी पाटीलचे ठुमके, घायाळ करणाऱ्या अदांवर खिळल्या नजरा