मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होणे दूर आधीपेक्षा झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात आज एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज 5 हजार 24 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल 4 हजार 841 रुग्णांची नोंद झाली होती, ती कालपर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या होती. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 52 हजार 765 वर पोहोचली आहे. यापैकी 79 हजार 815 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 65 हजार 829 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


आज एकूण 2 हजार 362 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.25 टक्के एवढं आहे. राज्यात आज 175 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 91 मृत्यू मागील 48 तासातील आहेत, तर उर्वरित 84 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. मृत्यूंमध्ये मुंबईतील 73, नाशिक 3, ठाणे 2, मीरा भाईंदर 1, पिंपरी चिंचवड 1 नंदुरबार 1 आणि औरंगबाद 1 यांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर 4.65 टक्के एवढा आहे.


मुंबईसह ठाणे, रायगड आणि आजूबाजूच्या परिसरात आतापर्यंत 1 लाख 10 हजार 830 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे विभागात 22 हजार 446 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. नाशिक विभागात 7359 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. औरंगाबाद विभागात 5110, कोल्हापूर विभागात 1839 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विदर्भातील नागपूर विभागात 2422 लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. तर लातूर विभागात 861 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 8 लाख 71 हजार 875 नमुन्यांपैकी 1 लाख 52 हजार 765 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 58 हजार 488 लोक होम क्वॉरंटाईन आहेत. तर 36 हजार 903 लोक संस्थात्मकर क्वॉरंटाईन आहेत.


Ram Kadam | बीएमसीच्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये औषधांच्या अभावानं वृद्धाचा मृत्यू; राम कदम यांचा आरोप