शिर्डी : चार दिवसांपूर्वी भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे यांनी ग्रामस्थांच्या सुलभ दर्शनाबाबत निर्णय झाल्याचे जाहीर केले होते. अशात आता मुख्यकार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी न्यायालयात ग्रामस्थ दर्शनाबाबत वेगळीच नियमावली सादर केली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ग्रामस्थ आक्रमक होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शब्द एक द्यायचा आणि वेगळाच निर्णय करायचा अशी भूमिका बगाटे यांनी घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


एकीकडे पत्रकारांना निर्बंध घातले असताना दुसरीकडे ग्रामस्थांनी सुद्धा सुलभ दर्शन मिळावे या मागणीसाठी बैठक घेऊन शिर्डी बंदचा इशारा दिला होता. यानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशी आमदार राधाकृष्ण विखे यांच्या मध्यस्तीनंतर मागण्या मान्य झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. लवकरच ग्रामस्थांना सुलभ दर्शन मिळेल असे वाटत असताना साई संस्थानच्या वतीनं बगाटे यांनी प्रत्यक्षात वेगळीच नियमावली मंजुरीसाठी उच्च न्यायालयात सादर केल्याची बाब समोर आल्यानं ग्रामस्थ आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिर्डीतील काही प्रमुख ग्रामस्थांनी आज बैठक घेऊन याबाबत प्रसार माध्यमांना माहिती देताना न्यायालयात धाव घेण्याबरोबर पुन्हा एकदा आंदोलन उभारण्याची गरज असल्याचा इशारा दिलाय.


ग्रामस्थांनी शिर्डी बंदचा इशारा देताच साईसंस्थान नरमले, विखेंची मध्यस्ती, वादावर पडदा


बगाटे यांची कारकीर्द पुन्हा एकदा वादग्रस्त असल्याच समोर आलं असून तीन दिवसांपूर्वी मागण्या मान्य असल्याचं सांगितलं व न्यायालयात मात्र वेगळीच नियमावली सादर करण्यात आलीय. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामस्थ विरुद्ध मुख्यकार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


कान्हूराज बगाटे पत्रकारांना का घाबरताय? शिर्डीत ड्रेसकोडनंतर गावकऱ्यांची अडवणूक,पत्रकारांना निर्बंध!