मुंबई: कृषी पतपुरवठा वेळेवर न करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
बँकांकडून शेतकऱ्यांना दिला जाणारा पतपुरवठा वेळेत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रीयकृत बँकांना सूचना दिल्या असल्याचंही यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले.
पतपुरवठा देण्यात होणाऱ्या विलंबासाठी मुनगंटीवार यांनी तालुकास्तरीय बँकांना जबाबदार धरलं आहे.“ सहा जिल्हातील तालुकास्तरीय बँका पतपुरवठा देण्यास उशीर करत आहेत. यामध्ये नाशिक टीडीसी बँकेचाही समावेश आहे. सहकार खात्याने तालुकास्तरीय बँकाकडून पतपुरवठा वेळेत करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत”, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
दरम्यान, बँकांकडून पतपुरवठा करण्यासाठी टाळाटाळ झाल्याने पेरणीच्या तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या.
पीककर्जासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई होणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jun 2018 06:57 PM (IST)
बँकांकडून शेतकऱ्यांना दिला जाणारा पतपुरवठा वेळेत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रीयकृत बँकांना सूचना दिल्या असल्याचंही यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -