CM Devendra Fadnavis and PM Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईसाठी एक नवीन अध्याय सुरु केला आहे. या तरुणाईला दिशा द्यायला आशा आकांक्षा पूर्ण करायला. मोदीजी (PM Modi) हा नवा अध्याय लिहत आहेत. त्यातही पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी करतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते शनिवारी पहाटे पंढरपूरमध्ये विठुरायाची महापूजा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी, पंढरपूर कॉरिडोअर, जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलन याबाबत सविस्तर भाष्य केले. (Ashadhi Ekadashi 2026)

Continues below advertisement

पांडुरंग हे सर्वसामान्यांचं दैवत आहे. सामान्य लोकांची विठ्ठलावर आस्था आहे, त्याच्यापासून लोक प्रेरणा घेतो, कितीही कष्ट आले तरी कष्टाचा सामना करतात. सरकारसाठी काही मागण्याची आवश्यकता नाही, पांडुरंगाला आपल्या मनातील कळतं, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. आषाढीची पूजा ही खरीपाच्या हंगामात होते. खरीपाचा हंगाम चांगला झाला तर शेतकरी सुखी होतो, राज्य सुखी होते. राज्यात चांगला पाऊस व्हावा, शेतकऱ्यांना दिलास मिळावा, आनंद यावा शेतकऱ्यांच्या जीवनात ही माझी विठुरायाच्या चरणी प्रार्थना आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Raj Thackeray and Uddhav Thackeray Morcha: राज-उद्धव ठाकरेंच्या मोर्चावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Continues below advertisement

मला असं वाटतं की, सगळ्यांना लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. हा मोर्चा होत आहे, त्याच्याशी विद्यार्थ्यांशी काही घेणेदेणं आहे, याची शक्यता कमी आहे. राजकारणात आपली जागा पुन्हा कशी तयार करता येईल, यासाठी हा प्रयत्न अधिक, तरीदेखील माझ्या शुभेच्छा आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दोन बाजू आहेत. प्रश्नाचं गांभीर्य असल्याने शांततेने आंदोलन करणारे दिसतात. आपलं भविष्य चांगलं असावे, यासाठी समर्थन देणारे दिसतात. दुसरीकडे राजकीय पोळी भाजणारे, हौशे नवशे, हिंसाचार करणारे लोक दिसतात. जाणीवपूर्व अराजकता तयार करणारे लोक आंदोलनात शिरले आहेत, हे दिसते. हे सगळं लक्षात घेऊन सोनम वांगचूक यांनी आपलं उपोषण सोडलं, त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या, शांततेने पुढे गेलं पाहिजे, असे त्यांनी सांगितले, याकडे देवेंद्र फडणवीस लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडोअरबाबतही भाष्य केले. पंढरपूर कॉरिडोअरचं काम यावर्षी सुरु झाले पाहिजे. त्यासाठी दोन-अडीच वर्षे लागतील. या कामाविषयी 80 ते 90 टक्के लोकांच्या शंका दूर झाल्या आहेत. उर्वरित लोकांच्या शंकाही दूर होतील. कॉरिडोअर पूर्ण झाल्यावर पंढरपूर नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीला पांडुरंगचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis on Farmers: शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च 25 टक्क्यांनी कमी करण्याची योजना

हमीभावाने दरवर्षी आपण धान्य खरेदी करतो. आज आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की, उत्पादन खर्च वाढत आहे. शेतमालाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते. त्याच्यामुळे आपल्याकडे उत्पादन खर्च सातत्याने वाढतो. उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून मोफत वीज आपण दिली, ठिंबक सिंचन व्यवस्था, सौरपंप, पाण्याची व्यवस्था मोफत देत आहोत. यंत्रसामुग्रीवर अनुदान देत आहोत. उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे न्यावे लागेल.महाविस्तार एआयच्या माध्यमातून 25 टक्क्यांनी उत्पादन खर्च कमी करण्याचा आणि उत्पादन वाढवण्याची सरकारची  योजना असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

आणखी वाचा

Ashadhi Ekadashi 2026 Wishes : 'काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल...'आषाढी एकादशीच्या मित्रपरिवाला द्या भरभरुन शुभेच्छा; पाठवा हे PHOTOS