पंढरपूर : आषाढीच्या दिवशी वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच संतांची परंपरा घेऊन रिंगण अंकही दाखल झालाय. आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिंगणच्या अंकाचं प्रकाशन केलं.


 

दरवर्षी एका संताचं कार्य, त्यांनी समाजाला दिलेला संदेश आणि आताची सामाजिक स्थिती रिंगण अंकातून मांडली जाते. यावर्षी निवृत्तीनाथांच्या कार्याचा आढावा रिंगणमधून घेण्यात आलाय. पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला.

संपादक सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी आजवर संत नामदेव, संत चोखामेळा यांच्यासह इतर संतांचं काम वारीच्या निमित्तानं महाराष्ट्रासमोर मांडलंय.