CISCE Class 10th, 12th Result 2025 : दहावी, बारावीच्या परीक्षा निकाला संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता ICSE (इयत्ता 10वी) आणि ISC (इयत्ता 12वी) बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका अधिकृत निवेदनातून ही माहिती समोर आली असून निकाल बोर्डाच्या मुख्यालयातून एकत्रितपणे जाहीर केला जाईल, असेही सांगण्यात आले आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल cisce.org या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकणार आहे. 

Continues below advertisement


शैक्षणिक वर्ष संपत असताना, भारतातील लाखो विद्यार्थी 2025 च्या बोर्ड परीक्षेच्या निकालांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच बोर्डाच्या मुख्यालयातून होणाऱ्या घोषणेनंतर, विद्यार्थी त्यांचा युनिक आयडी (Unique ID) and आणि इंडेक्स (Index) एंटर करून अधिकृत वेबसाइट cisce.org - वरून त्यांच्या गुणपत्रिका पाहू आणि डाउनलोड करू शकतात.


CISCE निकाल 2025 ची डायरेक्ट लिंक


ICSE दहावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 27 मार्च दरम्यान झाल्या, तर ISC बारावीच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान झाल्या. दोन्ही परीक्षा भारत आणि परदेशातील CISCE-संलग्न शाळांमध्ये सुरळीत पार पडल्या. 2024 मध्ये, ISC इयत्ता 12वी मध्ये मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 99.65 होता, तर मुलांचा तो 99.31% इतकाहोता, ज्यामुळे एकूण उत्तीर्ण होण्याचा टक्का 99.47% इतका होता. 


दरम्यान, 2024 मध्ये, आयसीएसई दहावीच्या परीक्षेत मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 98.92% होता, तर मुलांचा तो 97.53% होता, ज्यामुळे एकूण उत्तीर्ण होण्याचा टक्का 98.19% होता.


वेबसाइटवर निकाल कसा तपासायचा? (How to check the result on website)


Step 1: CISCE ची अधिकृत वेबसाइट www.cisce.org वर जा.


Step 2: होमपेजवर "ICSE board exams results 2025" किंवा "ISC board exams results 2025" साठी लिंक शोधा आणि ती सिलेक्ट करा.


Step 3: तुमचा अभ्यास मार्ग निश्चित करण्यासाठी "ICSE" किंवा "ISC" निवडा.


Step 4: तुमचा इंडेक्स नंबर (index number), युनिक आयडी (unique ID) आणि दाखवलेला कॅप्चा कोड (captcha code) एंटर करा.


Step 6: स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल.


Step 7: दिलेल्या सर्व माहितीचे काळजीपूर्वक परीक्षण करा.


Step 8: तुमच्या नोंदींसाठी, तुमचा निकाल डाउनलोड करा आणि त्यानंतर ती तुम्ही प्रिंट करू शकता.


इतर महत्वाच्या बातम्या 



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI