छत्रपती संभाजीनगर : धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून महत्वाकांशी योजना राबवली जात आहे. श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांच्या नावे ही योजना अंमलात आणण्यात आली. इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाकडून ही योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून धनगर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षणाबरोबरच वसतिगृहाची सोय करण्यात येते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे प्रतिवर्षी 70 हजार रुपये देण्यात येतात. मात्र अनेक ठिकाणी विद्यार्थी, वसतिगृह आणि सगळंच काही कागवर आहे. असं असलं तरी याचे पैसे मात्र उचलले गेले आहेत.
राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण खात्याचे मंत्री अतुल सावे आहेत. त्याच्याच जिल्ह्यातील वस्तुस्थिती दाखवणारा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
Yashwant Vidyarthi Yojana : विद्यार्थी आणि वसतिगृह कागदावरच
पहिले स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल आसेगाव या ठिकाणी भेट दिली. इथे विद्यार्थी आणि वसतिगृह कागदावरच असल्याचे दिसून आले. संस्थाचालकाने मात्र याचे अनुदान लाटले. वस्तुस्थिती पाहिली तर इथे एकही विद्यार्थी दिसला नाही. कम्प्युटर बंद पडलेले, अशी स्थिती या ठिकाणची होती. संस्थाचालकाने गेल्या वर्षी अनुदान मिळाल्याचं मान्य केलं. 100 विद्यार्थ्यांची मान्यता या शाळेला आहे.
Maharashtra Scheme Corruption : ना विद्यार्थी, ना होस्टेल, तरीही पैसे लाटले
गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल या दुसऱ्या शाळेला भेट दिली. निवासी शाळा असल्याने संध्याकाळी साडेसात वाजता शाळेचा रियालिटी चेक केला. इथे एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे इथे ना होस्टेल... ना विद्यार्थी... आणि मंजूर विद्यार्थी संख्या 100 आहे.
Dhanagar Community Scheme : मुला-मुलींना एकत्रच कोंबल्याचं चित्र
यानंतर श्री योगेश्वर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज महालपिंपरी इथे मात्र विद्यार्थी दिसून आले. विद्यार्थ्यांची मंजूर संख्या 100, परंतु 68 विद्यार्थी कागदावर आणि 25 विद्यार्थी उपस्थित होते. दोन खोल्यात विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबण्यात आलं आहे. या विदारक स्थितीत हे विद्यार्थी राहतात. तसेच मुले आणि मुली एकाच रूममध्ये राहत असल्याचं चित्र दिसून आले.
विद्यार्थांचा पत्ताच नाही, पण संस्थाचालकांनी अनुदान लाटलं
ज्या ठिकाणी स्वयंपाक घर होते. तिथे सिमेंटचे स्टोरेज आढळून आले. 20 संगणकाची आवश्यकता असताना त्यातील एक सुरू होते. मात्र ते देखील वापरात नाही अशी परिस्थिती या संस्थेमध्ये दिसून आली.
या संस्था चालकाने गेल्या वर्षी अनुदान उचललेले आहे. गेल्या वर्षी हीच मुले होते. असा दावा संस्थाचालकाने केला.. मात्र मुलांना सत्य परिस्थिती विचारली असता याच वर्षी आल्याचं त्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ शाळांमध्ये या योजनेच्या माध्यमातून धनगर समाजातील मुले शिक्षण घेत आहेत. त्या 9 शाळा नेमक्या कोणत्या पाहुयात,
1. लिटल वंडर्स स्कूल सिल्लोड, विद्यार्थी मान्यता - 250
2. मदरगंगा इंग्रजी शाळा हिवरखेडा तालुका कन्नड, विद्यार्थी मान्यता - 100
3. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल वाळुंज तालुका गंगापूर, विद्यार्थी मान्यता - 100
4. ओएसिस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फुलंब्री, विद्यार्थी मान्यता - 150
5. आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल पैठण, विद्यार्थी मान्यता - 100
6. स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आसेगाव, विद्यार्थी मान्यता - 100
7. श्री योगेश्वर इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज महालपिंपरी पो. वरूड काजी, विद्यार्थी मान्यता - 100
8. जितो पब्लिक स्कूल भानसीमाता रोड शरणापुर छत्रपती संभाजी नगर, विद्यार्थी मान्यता - 100
9. सर्वोदया इंटरनॅशनल स्कूल वरुड काझी , विद्यार्थी मान्यता - 100 (यांनी मात्र विद्यार्थी घेणार नसल्याचे कळवलं).
ही बातमी वाचा: