औरंगाबाद : अजित पवार गट (Ajit Pawar) आणि शरद पवार गटाचे (Sharad Pawar) नेत्यांकडून आता एकमेकांवर थेट टीका केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वर्षं शरद पवारांचे सहकारी राहिलेले दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पवारांवर घणाघाती टीका केली आहे. जनतेन एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं वळसे पाटील म्हणाले. आता त्यांच्या याच टीकेला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उत्तर दिले जात आहे. दिलीप वळसे पाटील यांचे हे वक्तव्य म्हणजे नमक हरामी असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले आहेत. 


वळसे पाटील यांच्या वक्तव्यावर बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, "शरद पवारांचे जर असे नेतृत्व होते, तर मग त्यांच्या मंत्रिमंडळात आपण 10 ते 20 वर्षे का अंडी उबवण्याचे काम केले. हा पण प्रश्न आहे. त्यावेळी शरद पवारांचे मंत्रीपद कसे गोड लागत होते. त्याच शरद पावरांचे विधानसभा अध्यक्षपद कसं गोड लागायचं. त्यामुळे मला वाटतं याला नमक हरामी म्हणतात. 


काय म्हणाले होते वळसे पाटील? 


दिलीप वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे  नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात.


वळसे पाटलांच्या विरोधात आंदोलन... 


जनतेन एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं वक्तव्य करणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात शरद पवार गटात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी वळसे पाटील यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर शरद पवारांच्या गटातील नेत्यांकडून देखील वळसे पाटील यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे.  


कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जीव घेणार धोरण...


एकीकडे राज्यात आणि देशात कांद्याला भाव द्यायचा नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे. 15 ऑगस्टपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली असतांना ते अजूनही मिळाले नाही. तसेच कांदा निर्यातवर 40 टक्के कर लावायचा. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या किती विरोधात जाणार, त्यांचे अंत पाहणार आहे. सरकारने कांद्याबाबत घेतेलेले धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात असून, जीव घेणारा असल्याचे दानवे म्हणाले.   


संबंधित बातम्या: 


Dilip Walse Patil: जनतेन एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केलं नाही, दिलीप वळसे पाटलांचा हल्लाबोल