छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने पुन्हा एकदा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद पाहायला मिळत आहे. तर, दोन्ही गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. 'नालायकांनो तुम्ही तुमची लायकी सोडली आहे', अशा शब्दात शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते.
दरम्यान, यावेळी बोलतांना शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे गटाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरले. त्यानंतर नालायक बाबत स्पष्टीकरण दिले आणि ही शिवी नाही असे ते म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो, दवाखाने काढले, आरक्षणाबाबत काम करतोय म्हणून आम्ही नालायक आहोत का?, आहोत आम्ही नालायक, पण आम्ही आम्ही घरात बसलो नाही. नालायकांनो हे पाप तुम्हाला फेडावे लागणार आहे, असे शिरसाट म्हणाले.
नालायकांनो तुम्ही तुमची लायकी सोडली
तर, तो दळवी कोण हरामखोर, हा पण वाईट शब्द नाही. हा पण चित्रपटात वापरला आहे. हा प्रचारवेळी पळून गेला होता आणि तो आम्हाला शिकवणार. नालायकांनो तुम्ही तुमची लायकी सोडली आहे. सेनाप्रमुखांच्या विचारांशी गद्दारी करणारे तुम्ही नालायक आहात. आता जर वाकडे बोलाल, तर तसेच उत्तर मिळेल. स्वतःला शिवसेनाप्रमुख समजतात. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसा, नालायकांनो ही तुमची लायकी आहे, असे शिरसाट म्हणाले.
उद्धव ठाकरेंना अटक करणार का?
उद्धव ठाकरे यांना अटक केली जाणार अशी चर्चा आहे. यावर बोलतांना शिरसाट म्हणाले की, "यांना अटक केली तर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्या सारखे करतील, म्हणून याना सोडून द्यावेत. तुम्ही लायकी काढली तर लोक तुमची लायकी काढेल. तुमच्यावर लोक करत असलेल्या रील्स पहा, तुम्हाला कळेल तुमची लायकी काय आहे. कशाला अटक फाटक करायची, यांच्यावर कारवाई नको यांच्या नादी लागू नये हेच महत्वाचं आहे,” असेही शिरसाट म्हणाले.
आत्ताची लोकं नुसते भुंकत आहेत
नारायण राणे यांनी काय चूक केली होती, त्यांनी बोलले तर अटक, आता तुम्ही बोलताय तर काय. दळवी तो आम्हाला हरामखोर म्हणतो, तर त्याला त्याच भाषेत उत्तर देऊ. बाळासाहेब शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणायचे, मात्र त्यांच्या सोबत जेवायचे. मात्र ही आत्ताची लोकं नुसते भुंकत आहेत. यापूर्वी राजकारण असे नव्हते, आदर होता मात्र यांनी राजकारणाची घाण केली, असल्याचे शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक, भरसभेत मुख्यामंत्र्यांना शिवीगाळ करणं भोवलं