छत्रपती संभाजीनगर: राज्यात उन्हाचा (Heat) चटका चांगलाच वाढत आहे. काही भागात तापमानाचा (temperature) पारा 40 अंशाच्या पुढे जात आहे. तर काही भागात अवकाळी पाऊसही (Rain) पडत आहे. दरम्यान, दिवसेंदिवस राज्यातील पाणीसाठ्यात (water) मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तर दुसरीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा कधीही बंद होऊ शकतो. महापालिकेने जलसंपदा विभागाचे 40 कोटी न भरल्याने त्यांनी नोटीस बजावली आहे.
शहराची तहान भागविण्यासाठी दररोज जायकवाडी धरणातून 130 ते 135 एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतो. या पाण्याचे बिल दरमहा जलसंपदा विभागाला भरावे लागते. मात्र मागील काही वर्षांपासून मनपाने पैसे भरले नाहीत. फेब्रुवारी महिन्यात जलसंपदा विभागाने 40 कोटींची थकबाकी भरावी म्हणून नोटीसही दिली होती. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विभागाकडून कोणत्याही क्षणी बंद केला जाऊ शकतो. काही वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने काही तास पाणीपुरवठा थांबविला होता.
पाणीपट्टीपोटी मनपाचे 15 कोटी रुपये थकीत
जलसंपदा विभागाला पाणीपट्टीपोटी मनपाचे 15 कोटी रुपये थकीत आहेत. संबंधित विभागाने दंड आणि व्याज लावून ही रक्कम 40 कोटी केली, असे मनपातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी काही ठरावीक रक्कम मनपाकडून भरण्यात येते. व्याज आणि दंड मनपा भरू शकत नाही असेही अधिकारी सांगत आहे.
मराठवाड्यात चिंताजनक स्थिती
राज्यात सध्या पाणी टंचाईच्या झळा लागत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाढत्या उन्हाबरोबर पाणी आणि चाराटंचाई वाढली आहे. अनेक धरणातील पाणीसाठ्यावर याचा परिणाम होत आहे. राज्यातील प्रमुख 138 मोठ्या धरणांमध्ये सध्या 32 टक्केच पाणीासाठा राहिला आहे. यामध्ये मराठवाड्याची स्थिती चिंताजनक आहे. कारण मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 16 टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळं तिथं पाणीटंचाईचं संकट गडद होताना दिसत आहे.
पाण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांची वणवण
दरम्यान, पाण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांची वणवण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. सध्या एप्रिल महिना सुरु आहे. पुढचा मे महिना पूर्ण उन्हाळा असणार आहे. त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. कारण जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. पाऊस लवकर पडला तर बरे नाहीतर लोकांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :