छ. संभाजीनगर : संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)  शहरातील  गारखेडा परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत गर्भलिंग निदान केंद्रावर रविवारी महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाने छापा टाकून कारवाई केली होती. यावेळी एक इंजिनिअरिंग करणारी 19 वर्षांची तरुणी हा सर्व रॅकेट चालवत असल्याची बाब समोर आली होती. दरम्यान याच प्रकरणात आता अनेक धागेदोरे समोर येत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात 15 ते 20 एजंट्सचं जाळं असल्याची माहिती देखील समोर आली आहे.


संभाजीनगर शहरातील  गारखेडा परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत गर्भलिंग निदान केंद्रावर रविवारी महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाने छापा टाकून कारवाई केली होती. यावेळी एक इंजिनिअरिंग करणारी 19 वर्षांची तरुणी हे सर्व रॅकेट चालवत असल्याची बाब समोर आली होती. दरम्यान याच प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू असताना आता अनेक धागेदोरे समोर येत आहे.


डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव  


गर्भलिंग निदानानंतर आरोपी तरूणीकडून गर्भपातासाठी सिल्लोड येथे महिलांना पाठवले जायचे. तर सिल्लोडच्या जय भवानीनगरमध्ये प्रसूतीगृह व स्त्रीरोग रुग्णालयाच्या नावाखाली आयुर्वेदिक डॉ. रोशन शांतीलाल ढाकरे हा राजरोस अर्भकांची पोटातच हत्या करत होता. पोलिसांनी आता त्याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात 15 ते 20  एजंटांचे जाळे असल्याची माहिती देखील समोर आली आहे.


 धारदार ब्लेडचा वापर करत काढायचा गर्भ बाहेर 


 डॉ. रोशन ढाकरेपर्यंत  पोहोचल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले. ढाकरेसह त्याला मदत करणाऱ्या चार कंपाउंडरांना अटक करण्यात आली. जिल्हाभरात 15 ते 20 एजंटांचे जाळे पसरल्याचेही पोलिसांनी सांगितले. धक्कादायक म्हणजे ढाकरे अर्भकाचे मृतदेह शेतात पुरायचा.  धारदार ब्लेडचा वापर करत गर्भ बाहेर काढले जायचे. चार तासांत गर्भपात महिलेला सोडले जायचे, अशी देखील माहिती येत आहे.  पोलिस या रॅकेटचा तपास करत आहेत. ढाकरेकडे कोणताही गर्भपात केंद्राचा परवाना नव्हता.  विशेष म्हणजे सिल्लोडच्या पोलिस स्थानक आणि जिल्हा रुग्णालयापासून एक किलोमीटर अंतरावर हा प्रकार सुरू होता.


रोज नवे खुलासे   


विशेष म्हणजे शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत एक इंजिनिअरिंग करणारी तरुणी गर्भनिदान केंद्र चालवत असल्याचा समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ  उडाली होती. त्यानंतर रोज खुलासे होत आहेत.  


हे ही वाचा :


धक्कादायक! मातृदिनीच गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त, संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय इंजिनिअरींग तरुणीच होती मास्टरमाईंड