RTO Vehicles Inspection : समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या अपघातांच्या (Accident) घटनांमुळे सतत चर्चेत राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एका खाजगी बसचा अपघात होऊन 21 प्रवाशांचा जळून जागीच मृत्यू झाला होता. त्यातच आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर तालुक्यात पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून, ज्यात 12 लोकांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची मालिका रोखण्यासाठी आरटीओ प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपयायोजना देखील केल्या जात आहे. मागील सहा महिन्यात समृद्धी महामार्गावर एकूण 5 हजार 3621 वाहनांची तपासणी आरटीओच्या पथकाने केली आहे. ज्यात 9 हजार 670 वाहनांची तपासणी छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओ पथकांनी केली आहे. 


समृद्धी महामार्गावरील होणारे अपघात लक्षात घेता आरटीओ विभागाकडून सतत उपाययोजना करण्यात येत आहे. ज्यात समृद्धी महामार्गावर वाहन येताच त्या वाहनांच्या टायरची तपासणी केली जाते. तसेच जर वाहनांचे टायर ठरलेल्या नियमात बसत नसल्यास अशा वाहनांना समृद्धी महामार्गावर एन्ट्री दिली जात नाही. सोबतच दारू पिऊन वाहनचालक गाडी चालवत असल्यास त्यांच्यावर कारवाई करत, त्यांना देखील मृद्धी महामार्गावर एन्ट्री दिली जात नाही. दरम्यान, मागील सहा महिन्यात समृद्धी महामार्गावर एकूण 5 हजार 3621 वाहनांची तपासणी आरटीओच्या पथकाने केली आहे. ज्यात 9 हजार 670 वाहनांची तपासणी छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओ पथकांनी केली असल्याची माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


14 एप्रिल ते 14 ऑक्टोबर पर्यंत कारवाई..



  • समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर आरटीओ यांनी 9 हजार 670 वाहनांची टायर तपासणी केली आहे. 

  • तर संपूर्ण समृद्धी महामार्गावर 5 हजार 3621 वाहनांची टायर तपासले आहेत. 


छत्रपती संभाजीनगर आरटीओ 'ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम (जून ते ऑक्टोबर)



  • एकूण 990 बसची तपासणी करण्यात आली. 

  • एकूण 3 हजार 78 ट्रक चालकांची तपासणी करण्यात आली. 

  • एकूण 4 डिटेक्ट चालकांवर कारवाई करण्यात आली. 


संपूर्ण समृद्धीवर आरटीओकडून 'ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम (जून ते ऑक्टोबर)



  • एकूण 5 हजार 320 बसची तपासणी करण्यात आली. 

  • एकूण 8 हजार 201 ट्रक चालकांची तपासणी करण्यात आली. 

  • एकूण 13  चालकांवर 'ड्रंक अँड ड्राइव्ह’ची कारवाई करण्यात आली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Samriddhi Highway Accident : समृद्धीवरील अपघातातील मयत आरटीओच्या वाटमारीचे बळी; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप