Chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati sambhaji nagar) रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. आज दिवसभर शहरातील विविध ठिकाणी चौकाचौकात पोलीस बंदोबस (Police) असणार आहे. ज्यात एसआरपी आणि रॅपिड ऍक्शन फोर्स अशी पथके देखील असणार आहेत. शहरात सहा चेक पोस्ट असणार आहेत. तर प्रत्येक ईदगाह आणि मस्जिदबाहेर देखील पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या वादानंतर पोलीस प्रशान सतर्क झालं आहे.
कसा असेल बंदोबस्त
1) पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती अपर्णा गीते (पोलीस उपायुक्त मुख्यालय) दिपक गिऱ्हे (पोलीस उपायुक्त झोन-1) , श्री शीलवंत नांदेडकर (पोलीस उपायुक्त झोन-2 ) यांच्या देखरेखीखाली शहरातील पाच सहायक पोलीस आयुक्त, 34 पोलीस निरीक्षक 121 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक 1590 पोलीस अंमलदार तसेच 80 महिला अंमलदार सोबतच शहरातील सर्व इदगाह मैदान व तेथे जाणारे व येणारे मार्ग यावरवर लक्ष ठेवण्यासाठी 12 व्हिडिओ ग्राफर, याव्यतिरिक्त विशेष शाखा आणि गुन्हे शाखा यांचा साध्या गणवेशातील बंदोबस्त नेमलेला आहे.
2) शहरातील संवेदनशील ठिकाणी 68 फिक्स पॉईंट
3) घातपात विरोधी तपासणीसाठी विशेष पथक तसेच हद्दीवर सहा ठिकाणी check post आधिकारी आणि अंमलदारांची नेमणुक करण्यात आली आहे. शहरात येणारे- जाणाऱ्यांवर विशेष निगराणी ठेवली जाणार आहे
4) ) Rapid Action Force ची एक कंपनीसह बारा ठिकाणी एस आर पी एफ चा स्पेशल बंदोबस्त करण्यात आला आहे.
5) बारा स्ट्रायकिंग फोर्स, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नियंत्रण कक्ष इथे राखीव राहतील.
6) याव्यतिरिक्त शहरभर पोलीस स्टेशनच्या पीटर मोबाईल, सेकंड मोबाईल, पीसीआर 112 बीट मार्शल, यांच्यामार्फत विशेषगस्त राहणार आहे
7) शहरातील सर्व ठिकाणी command control center मार्फत विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
रमजान महिन्याचं महत्त्व
इस्लाम धर्मात रमजान महिन्याला मोठे महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लीम बांधव उपवास करत असतात. याच उपवासांना अरबी भाषेत सौम तर फारसी भाषेत रोजा असे म्हटले जाते. एक महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते. या महिन्यात इस्लामने दानधर्माचे प्रंचड महत्व सांगितले आहे. रमजान महिन्यातच इस्लामचे पवित्र ग्रंथ असलेले कुरान अवतरित झाले, अशी मुस्लीम बांधवांची श्रद्धा आहे.
महत्त्वाच्या बातम्या: