Sharad Pawar in Aurangabad : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजपासून दोन दिवसीय औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. दरम्यान, तीन वाजेच्या सुमारास त्यांचे औरंगाबादच्या विमानतळावर आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर, शरद पवार विमानतळावर दाखल होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्यासह काही तालुकाध्यक्ष अजित पवारांच्या गटात सहभागी झाले आहेत. मात्र, त्यानंतर देखील औरंगाबादेत शरद पवारांचे जंगी स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तरुणांची मोठी गर्दी होती.
कोण आला रे कोण आला? मोदी-शाहांचा बाप आला...
शरद पवार विमानतळाच्या गेटमधून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. "महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार...शरद पवार, कोण आला रे कोण आला? मोदी-शाहांचा बाप आला...” अशा घोषणा देण्यात आल्या. तर शरद पवारांसोबत फोटो काढण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली. कार्यकर्त्यांची गर्दीमुळे पवारांची गाडी निघणे देखील अवघड झाले होते. त्यामुळे शेवटी पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत पवारांचा ताफा जाण्यासाठी रस्ता करून दिला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, रोहित पवार आज शहरात
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तथा आमदार रोहित पवार हे आज शहरात आहेत. रोहित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन येथे सकाळी 9 वाजता ध्वजारोहण झाले. तर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे यांचे 3 वाजेच्या दरम्यान शहरात आगमन झाले. दरम्यान, रोहित पवार यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनी शहरातील आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबर बैठक देखील घेतली आहे. सोबतच, ग्रामीण भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन पक्षबांधणी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.
असा असणार शरद पवारांचा दौरा...
मराठी साहित्यातील महान कवी व गीतकार, पद्मश्री ना. धों. महानोर यांचे नुकतेच निधन झाले. तर, महानोर यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या औरंगाबादमध्ये त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी शहरातील विविध संस्थांच्यावतीने 'पक्षी दूर देशी गेलं' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात मंगळवारी होणाऱ्या या कार्यक्रमाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच, शरद पवार हे बुधवारी (16 ऑगस्ट) रोजी कवी महानोर यांच्या पळसखेडा येथील निवासस्थानी जात त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतील. त्यानंतर दुपारी चार वाजता पुन्हा औरंगाबाद शहरात दाखल होतील. त्यानंतर प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच्या निवासस्थानी भेट देतील. सायंकाळी सहा वाजता एमजीएम विद्यापीठातील रुख्मिणी सभागृहात होणाऱ्या प्राचार्य बोराडे यांच्या शोकसभेला उपस्थित राहतील.
इतर महत्वाच्या बातम्या:
शरद पवारांच्या विचारामुळे बीड जिल्ह्याच्या मतदारांनी चार आमदारांना निवडून दिलं : रोहित पवार