संभाजीनगर : राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे (Election) वेध महाराष्ट्राला लागले असतानाच आता निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. तब्बल 9 वर्षानंतर महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजत असल्याने राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्त्यांनाही याची उत्सुकता होती. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी (Muncipal corporation) 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकालाचा गुलाल उधळला जाणार आहे. त्यामध्ये, मराठवाड्याच्या (Marathwada) 8 जिल्ह्यातील 5 महापालिकांसाठी निवडणुका होत असून छ. संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड-वाघाळा आणि लातूर महापालिकांचा बिगुल आज वाजला. 

Continues below advertisement

निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा करताच आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून छत्रपती संभाजीनगरची महापालिका आहे. संभाजीनगर महापालिकेतील सदस्य संख्या 113 एवढी असून त्यापाठोपाठ नांदेड-वाघाळा महापालिका 81, लातूर 70 आणि परभणीसाठी 65 सदस्यसंख्या आहे. तर, नव्याने झालेल्या जालना महापालिकेतील सदस्य संख्या एवढी आहे. 

असा असेल महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम?

⦁ नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर ⦁ अर्जाची छाननी  - 31 डिसेंबर⦁ उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी ⦁ चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारी ⦁ मतदान - 15 जानेवारी ⦁ निकाल - 16 जानेवारी

Continues below advertisement

Municipal Election: महापालिकांची निवडणूक  

1. बृहन्मुंबई - 2272. भिवंडी-निजामपूर - 903. नागपूर – 1514. पुणे – 1625. ठाणे - 1316. अहमदनगर - 687. नाशिक – 1228. पिंपरी-चिंचवड - 1289. छ. संभाजीनगर - 11310. वसई-विरार - 11511. कल्याण-डोंबिवली - 12212. नवी मुंबई - 11113. अकोला - 8014. अमरावती - 8715. लातूर - 7016. नांदेड-वाघाळा - 8117. मीरा-भाईंदर - 9618. उल्हासनगर - 7819. चंद्रपूर - 6620. धुळे - 7421. जळगाव - 7522. मालेगाव - 8423. कोल्हापूर - 9224. सांगली-मिरज-कुपवाड - 7825. सोलापूर - 11326. इचलकरंजी – 76 27. जालना28. पनवेल - 7829. परभणी – 65