छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात (Marathwada) यंदा अपेक्षित पाऊस (Rain) झाला नसल्याने चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही अनेक भागात सरासरी एवढं पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. तसेच, मराठवाड्यातील 76 तालुक्यांपैकी 29 तालुक्यात सरासरीच्या तुलनेत निम्मा पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, छत्रपती संभाजीनगर विभागात सप्टेंबर महिन्यात सरासरी 199.9 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
'या' 29 तालुक्यात निम्माच पाऊस
- बीड जिल्ह्यात : बीड तालुका 45.9 टक्के, पाटोदा 46.6, माजलगाव 47.3, अंबाजोगाई 49, परळी 36, धारूर .5.7, वडवणी 33.6, शिरूरकासार 51.4 टक्के पाऊस झाला.
- लातूर जिल्ह्यात : चाकूर तालुक्यात 58.2, रेणापूर 66.6 टक्के पाऊस झाला.
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात : पैठण 45.9, वैजापूर 53.7, खुलताबाद 46.3, सिल्लोड 55.7, फुलंब्री 47.5 टक्के पाऊस झाला.
- जालना जिल्ह्यात : भोकरदन 53.7, जालना 47, अंबड 52.2, परतूर 39.7, बदनापूर 47, मंठा 40.1 टक्के पाऊस झाला.
- धाराशिव जिल्ह्यातील: धाराशिव 64.3, तुळजापूर 66.9, कळंब 68.7, वाशी 68.6 टक्के पाऊस झाला.
- परभणी जिल्ह्यातील: परभणी 45.5 गंगाखेड 65.2, पाथरी 43.7, पूर्णा 49.4, सेलू 44.7, मानवत 43.8 टक्केच पाऊस झाला आहे.
अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा...
गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदा पावसाचा खंड पाहायला मिळाला. त्यामुळे विभागातील अनेक भागात सरासरी एवढा अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक प्रकल्प कोरडेठाक पडले असून, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी सुद्धा आटल्या आहेत. अशा परिस्थितीत गावकऱ्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे आत्ताच अशी परिस्थितीत असल्यास आगामी काळात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
अ.क्र | जिल्हा | अपेक्षित पाऊस | प्रत्यक्षात पाऊस |
1 | छत्रपती संभाजीनगर | 581.7 | 527.2 |
2 | जालना | 603.1 | 486.2 |
3 | बीड | 566.1 | 438.9 |
4 | लातूर | 706 | 510.6 |
5 | धाराशिव | 603.1 | 426.9 |
6 | नांदेड | 814.4 | 883.3 |
7 | परभणी | 461.3 | 517.5 |
8 | हिंगोली | 695.3 | 740.1 |
रब्बीची चिंता वाढली...
यंदा मान्सून उशिरा आला. तसेच पूर्ण पावसाळ्यात आतापर्यंत अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे खरिपाच्या हंगामाला याचा मोठा फटका बसला. मागील तीन वर्षांपासून अतिवृष्टी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा मोठी अपेक्षा होती. परंतु, आता खरीप हातून गेले आहे. त्यातच आता मराठवाड्यातील अनेक भागात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने रब्बीचा हंगाम देखील हातून जाण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: