छत्रपती संभाजीनगर : मंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यावरून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, त्यांच्या याच टीकेला उत्तर देतांना भाजपचे नेते आशीष शेलार यांनी आदित्य यांचा आदूबाळ म्हणून उल्लेख केला होता. तर, आता शेलार यांच्या टीकेला उत्तर देतांना, 'तिकडे पप्पूनं हादरवलं, इकडे आदूबाळानं सळो की पळो केलंय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मागील दोन दिवसांपासून आदित्य ठाकरे सतत सरकारवर हल्लाबोल करत आहे. मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून देखील आदित्य यांनी जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून आदित्य यांच्यावर टीका करण्यात आली आहे. भाजप नेते शेलार यांनी आदित्य यांच्यावर टीका करतांना 'बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्याने दुसर्यांना शहाणपण शिकवायचे नसते असे म्हटले होते. यावर आता आदित्य यांनी उत्तर दिले आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
सरकारवर टीका करतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, एक पप्पूने यांना हलवून ठेवलं आहे. माझ्या नावात देखील बाळ लावले. पण माझ्या आजोबांच्या नावातील नावं असल्याने मला याचे अभिमान आहे. भाजपची ही नवीन भाषा आहे का? आम्ही ज्या भाजपला ओळखत होतो ती ही भाजप नाही. त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. माझ्या ट्वीटमुळे मंत्र्यांची परदेशवारी रद्द करावी लागली आहे. जनतेच्या पैशांवर यांनी मजा करू नयेत. तर, तिकडे पप्पूनं हादरवलं आणि इकडे आदूबाळानं सळो की पळो केलंय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर...
आमदार आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. शहरात सुरु असलेल्या इंडियन असोसिएशन ऑफ टूर्स ऑपरेटर्स या संस्थेच्या 38 व्या वार्षिक परिषदेस आदित्य ठाकरे भेट देणार आहे. यासाठी आदित्य ठाकरे चिकलठाण विमानतळ येथे पोहचले असून, ते हॉटेल रामा इंटरनॅशनल येथील चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा शोध या विषयावर ते उपस्थितांशी संवाद साधणार असुन या चर्चासत्रात त्यांच्या समवेत प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, कृषी पर्यटन विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग तावरे व लेमन ट्रीचे अध्यक्ष विक्रमजीत सिंह सहभागी असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: