मुंबई : राज्याच्या राजकारणात मराठवाड्याचं मोठं योगदान असून मराठवाड्यातील (Marathwada) नेतेमंडळी मराठवाड्याच्या विकासासाठी नेहमी आग्रही असते. त्यामुळेच, मुख्यमंत्री कोणीही असो, मराठवाड्याच्या विकासासाकडे, आमदार, खासदारांकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे (Election) सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असते. लोकसभा निवडणुकीत 8 खासदार आणि विधानसभेला 48 आमदार सभागृहात पाठवणाऱ्या मराठवाड्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. येथे 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांचाही बिगुल वाजणार आहे. 

Continues below advertisement

मराठवाडा विभागातील संपूर्ण आठ जिल्ह्यात मिळून 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती नगरपरिषद आणि किती नगरपंचायतसाठी निवडणूक होत आहे, यासंदर्भाती माहिती खाली देण्यात आली आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात एकूण 48 नगरपालिका आणि 11 नगरपंचायत आहेत. तर, संभाजीनगर, लातूर या दोन महापालिकांसाठी निवडणुका होणार आहे. त्यात, सर्वप्रथम नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगावर आता वेळेचे बंधन आले असून, निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आज सर्वाधिक मानली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपरिषद : 05 

गंगापूर नगरपरिषद कन्नड नगरपरिषद खुल्ताबाद नगरपरिषद पैठण नगरपरिषद वैजापूर नगरपरिषद

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपंचायत : 01

फुलंब्री नगरपंचायत 

बीड जिल्ह्यातील नगरपरिषद 06

बीड नगरपरिषद गेवराई नगरपरिषदधारूर नगरपरिषदपरळी-वैजनाथ नगरपरिषदमाजलगाव नगरपरिषद अंबाजोगाई नगरपरिषद 

जालना जिल्ह्यातील नगरपरिषद 03

अंबड नगरपरिषदभोकरदन नगरपरिषदपरतूर नगरपरिषद

जालना जिल्ह्यातील नगरपंचायत 04

घनसावंगी नगरपंचायत तिर्थपुरी नगरपंचायतमंठा नगरपंचायतबदनापूर नगरपंचायत

परभणी जिल्ह्यातील नगरपरिषद 07

गंगाखेड नगरपरिषदजिंतूर नगरपरिषदमानवत नगरपरिषदपाथरी नगरपरिषदपूर्णा नगरपरिषदसेलू नगरपरिषद सोनपेठ नगरपरिषद

हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषद 03

हिंगोली नगरपरिषद कळमनुरी नगरपरिषदवसमत नगरपरिषद

लातूर जिल्ह्यातील नगरपरिषद 04

अहमदपूर नगरपरिषद औसा नगरपरिषद निलंगा नगरपरिषद नगरपरिषद उदगीर नगरपरिषद नगरपरिषद  

लातूर जिल्ह्यातील नगरपंचायत 05

चाकूर नगरपंचायत नगरपंचायत देओणी नगरपंचायत नगरपंचायत जळकोट नगरपंचायत नगरपंचायत रेणापूर नगरपंचायत नगरपंचायत  शिरुर अनंतपाल नगरपंचायत 

धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद 08

धाराशिव  नगरपरिषद  तुळजापूर नगरपरिषद  उमरगा नगरपरिषद  मुरूम नगरपरिषद   कळंब नगरपरिषद   भुम नगरपरिषद   परंडा नगरपरिषदनळदुर्ग नगरपरिषद

नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद 12 

किनवट नगरपरिषदभोकर नगरपरिषदहदगाव नगरपरिषदउमरी नगरपरिषदधर्माबाद नगरपरिषदबिलोली नगरपरिषदमुखेड नगरपरिषददेगलूर नगरपरिषदलोहा नगरपरिषदकंधार नगरपरिषदमुदखेड नगरपरिषदकुंडलवाडी नगरपरिषद

नांदेड जिल्ह्यातील नगरपंचायत : 01

हिमायतनगर नगरपंचायत

हेही वाचा

मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार