Maharashtra Budget 2023: राज्याचा अर्थसंकल्प काल (9 मार्च)  विधीमंडळात सादर करण्यात आला. राज्याच्या अर्थसंकल्पात (Budget) शिंदे-फडणवीस सरकारने अनेक गोष्टींची घोषणा केली आहे. मात्र याच अर्थसंकल्पातून तीन मंत्री असलेल्या छत्रपती संभाजीनगरला (Chhatrapati Sambhajinagar) काय मिळणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जिल्हा‎ नियोजन समितीचा वार्षिक निधीत आखडता हात घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील तीन मंत्री असताना देखील, अर्थसंकल्पात जिल्ह्याला केवळ 60 कोटी‎ रुपयांचा वाढीव निधी मिळाला आहे. विशेष म्हणजे 'मविआ'च्या काळात 135 कोटी‎ रुपयांचा वाढीव निधी मिळाला होता.  


शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातून शहर वासियांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जिल्हा‎ नियोजन समितीचा वार्षिक आराखड्याच्या 250 कोटी‎ रुपयांचा वाढीचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला होता. मात्र अर्थसंकल्पा जिल्ह्याला फक्त 60 कोटींचा वाढीव निधी मिळाला आहे. विशेष म्हणजे 2021-22 मध्ये जिल्हा‎ नियोजन समितीचा वार्षिक निधी 365 कोटी रुपयांचा होता. परंतु तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 365 ‎कोटींचा आराखडा थेट 500 कोटींवर नेत‎ सर्वाधिक वाढीव निधी मिळवला होता. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याला केवळ 60 कोटी‎ रुपयांचा निधी मिळाला आहे.‎ त्यामुळे जिल्ह्यात रोहयोमंत्री,‎ पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल‎ सत्तार आणि सहकारमंत्री अतुल सावे यांचे सारखे तीन मंत्री असून, देखील जिल्हा‎ नियोजन समितीचा वार्षिक आराखड्याच्या निधीत आखडता हात घेण्यात आला आहे. 


छत्रपती संभाजीनगरला काय मिळाले? 



  • पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास करणार याकरिता भरीव तरतूद करण्यात येईल.

  • छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी 50 कोटी निधी देणार.

  • विश्वास नगर, लेबर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत बांधण्या करिता तरतूद.

  • जायकवाडी नाथसागर जलाशयास तरंगत्या सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती करणार. 

  • छत्रपती संभाजी नगर विमानतळ भूसंपादनासाठी रक्कम रु. 740 कोटी निधी उपलब्ध.

  • घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग प्राचीन मंदिराच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करणार.

  • छत्रपती संभाजीनगर येथे शिवचरित्रावरील उद्यान विकसित करणार.

  • मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे.

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर व पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा.

  • फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकामासाठी निधी उपलब्ध.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर येथे मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहासाठी निधी उपलब्ध.

  • सांजूळ लघु प्रकल्प ता. फुलंब्री, गंधेश्वर लघु प्रकल्प ता. कन्नड, पूर्णा निवपूर मध्यम प्रकल्प ता. कन्नड, अंबाडी मध्यम प्रकल्प ता. कन्नड, अंजना पळशी मध्यम प्रकल्प ता. कन्नड विशेष दुरुस्ती अंतर्गत निधी उपलब्ध.

  • अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे व मुलींचे शासकीय निवासी शाळा, फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील निवासी शाळासाठी निधी उपलब्ध.

  • कन्नड येथे न्यायालयीन इमारतीसाठी निधीची तरतूद.

  • गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय व्ही. व्ही.आय.पी. विश्रामगृहाचे बांधकामासाठी निधीची तरतूद

  • खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर येथील तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकरिता शासकीय निवासस्थानाचे बांधकाम साठी निधीची तरतूद.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा', सोयाबीन-कापसाच्या मुद्यावरुन तुपकर आक्रमक