Imtiyaz Jaleel: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव (Dharashiv) करण्याचा निर्णयाला केंद्राने परवानगी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांचे नाव बदलले आहे. परंतु या निर्णयाला विरोध करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आपल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फोन करून जी-20 (G-20) च्या पार्श्वभूमीवर आंदोलन न करण्याची विनंती केल्याने सद्या हे आंदोलन करणार नसल्याचा खुलासा जलील यांनी केला आहे. याबाबत जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. 


दरम्यान याबाबत बोलताना जलील म्हणाले, न्यायालयात प्रकिया सुरु असताना देखील केंद्र सरकार हुकमशाही पद्धतीने जिल्ह्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याला मी जर जी-20 च्या बैठकीदरम्यान विरोध केला असता तर काय झाले असते. मी तसे करू देखील शकत होतो. पण मला केंद्रीय मंत्री भागवत कराड, पोलीस आयुक्त निखील गुप्ता आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. जी-20 चे पार्श्वभूमीवर आपण सद्या कोणतेही आंदोलन करू नयेत अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे हे शहर माझे देखील असून, सद्या आम्ही हे आंदोलन करणार नाही. पण त्यानंतर आम्ही आंदोलन करणारच अहोत आणि मोठ्याप्रमाणावर करणार असल्याचं जलील म्हणाले आहे. तर 27 मार्चच्या आधी आम्ही आंदोलन करणार असल्याचं जलील म्हणाले. 


'या' चार शहरांचे नाव देखील बदला! 


यापूर्वी देखील जेव्हा-जेव्हा शहरांचे नावं बदलण्याचा मुद्दा समोर आला, तेव्हा-तेव्हा मी त्याचा विरोध केला आहे. त्यामुळे आज देखील मी विरोध करत आहेत. नामांतराचा मुद्दा जाती-धर्माचा मुद्दा नाही. याला काही पत्रकार जातीत रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. जाणीवपूर्वक काहीतरी षडयंत्र रचले जात आहे. तर माझा केंद्र आणि राज्य सरकारला आवाहन आहे की, त्यांनी राज्यातील इतर चार महत्वाच्या शहरांचे देखील नाव बदलले पाहिजे. कोल्हापूरचे नाव छत्रपती शाहूमहाराज यांचे नाव द्यावे, तर पुणे शहराचे नाव बदलून फुलेनगर, नागपूर शहराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे आणि मुंबई शहराचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी जलील यांनी केली. 


बिहारमधील औरंगाबादचे नाव देखील बदला! 


दरम्यान यावेळी बोलताना जलील यांनी भाजपवर देखील टीका केली. औरंगाबादचे नाव बदलणाऱ्या भाजपला माझा एक प्रश्न आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद तुम्हाला चालत नाही, परंतु तुम्हाला बिहारमधील औरंगाबाद कसे चालतो. विशेष म्हणजे बिहारमधील औरंगाबाद शहराचे खासदार भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपकडून दुप्पटी भूमिका घेण्याचे काम सुरु असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


'तुम्हारा G20, मेरा T20'; नामांतरावरुन इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा, प्रशासन अलर्ट