Chhatrapati Sambhaji Nagar News : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभरातील राज्यसरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेली आहे. हे शासकीय कर्मचारी 14 मार्चपासून संपावर गेले असून, आज संपाचा सातवा दिवस आहे. दरम्यान आज राज्यभरातील संपकऱ्यांनी 'थाळी बजाव' आंदोलन केले. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) संपकऱ्यांनी चक्क जिल्हाधिकारी यांच्या गाडीला घेरावा घातल्याचे पाहायला मिळाले. एवढच नाही तर त्यांच्या गाडीला पुढे जाण्यासाठी रस्ता दिला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी स्वतः गाडीतून उतरून आपल्या कार्यलयात गेले. 


जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. दरम्यान याच संपात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी संपावर गेले आहेत. दरम्यान आज संपाच्या सातव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात संपकऱ्यांकडून 'थाळी बजाव' आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलन सुरु असतानाच जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांची गाडी कार्यालयात दाखल झाली.  तर गाडी येताच संपकरी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. तसेच गाडी पुढे जाण्यासाठी रस्ता दिला नाही. सोबतच जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्यासमोर थाळी वाजवून जुनी पेन्शनची मागणी केली. मात्र जिल्हाधिकारी गाडीतून उतरून थेट आपल्या कार्यालयात गेले. 


सातव्या दिवशीही संप सुरूच...


जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभरातील राज्यसरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी 14 मार्चपासून संपावर गेले आहेत. दरम्यान या संपात मराठवाड्यातील तब्बल सव्वालाख शासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. तर सरकार आणि संपकरी यांच्या चर्चेतून मार्ग निघत नसल्याने आज सातव्या दिवशी देखील संप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. तर संपात सहभागी असलेल्या आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात थाळी बजाव आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली. 'एकच मिशन जुनी पेन्शन' असा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तर यावेळी महिला कर्मचारी यांची उपस्थिती लक्षणीय होती. 


आरोग्य विभागावर परिणाम...


शासकीय कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा देखील सहभागी आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात असलेले कर्मचारी सुद्धा संपावर गेले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कर्मचारीच नसल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहे. सोबतच रुग्णांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांना देखील मोठ्याप्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कर्मचारी नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढावे लागत आहे. तसेच रुग्णालयात सर्वत्र अस्वच्छत पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar : भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून 'औरंगाबाद' फ्लेक्सची तोडफोड; पोलिसांत गुन्हा दाखल