HSC Exam Scam : बारावीच्या परीक्षेच्या (HSC Exam) भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर असल्याचे समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या संपूर्ण 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचे चौकशीत समोर आले होते. दरम्यान अखेर बोर्डाने बारावीच्या उत्तरपत्रिकेत लिहिलेल्या दुसऱ्या हस्ताक्षराचा शोध लावला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या 372 उत्तरपत्रिकेत एकाच अक्षरात लिहिणाऱ्या दोन प्राध्यापकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला आहे. हे दोघे प्राध्यापक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालयात उध्यापक म्हणून कार्यरत आहेत. उसारे राहुल भगवानसिंग (रा पिंपळा ता. सोयगाव), मनीषा भागवत शिंदे (रा. धनवट ता.सोयगाव) असे आरोपींचे नावं आहेत. तर सोयगाव पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी असलेले रंगनाथ रेवबा आढाव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


बारावीच्या भौतीकशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन वेगवेगळे हस्ताक्षर आढळून आल्याचं प्रकार समोर आला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणात बोर्डाने एक चौकशी समिती नेमली होती. दरम्यान यावेळी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील या उत्तरपत्रिका असल्याचे समोर आले. पण दुसरे हस्ताक्षर कोणाचे याचा शोध घेण्यासाठी विद्यार्थी, परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कस्टडियनची, मॉडरेटर आणि प्राचार्यांची चौकशी करण्यात आली.  या चौकशी अंती समितीने उसारे राहुल भगवानसिंग आणि मनीषा भागवत शिंदे या दोन्ही अध्यापकांना दोषी ठरविल्याचा अहवाल सादर केला. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


यामुळे केला गुन्हा दाखल... 


बारावीच्या भौतीकशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन वेगवेगळे हस्ताक्षर आढळून आल्यावर चौकशी समितीने विद्यार्थी, परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कस्टडियनची, मॉडरेटर आणि प्राचार्यांची चौकशी केली. ज्यात सोयगाव तालुक्यातील राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालयाचे उध्यापक राहुल उसारे आणि अध्यापिका मनिषा शिंदे यांच्याकडे संबंधित उत्तरपत्रिका तपासण्यासाठी देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांना 13 मार्चपर्यंत या उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे आदेश असताना त्यांनी उत्तरपत्रिका 25 दिवस स्वतःकडे ठेवून 8 एप्रिल रोजी बोर्डाकडे परत पाठवल्या होत्या. तसेच या उत्तरपत्रिका तपासल्यानंतर यामध्ये दोन वेगेवेगळे अक्षर असल्याची महिती देखील बोर्डाला दिली नव्हती. पण हीच बाब उत्तरपत्रिकांची पुर्नतपासणी करत असताना मॉडरेटच्या लक्षात आली आणि त्यांनी याची माहिती बोर्डाकडे दिली. त्यामुळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


HSC Exam: उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर, प्राचार्यांच्या चौकशीसह गुन्हा दाखल होण्याची शक्यता


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI