Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहर पोलिसांनी (City Police) मोठी कारवाई करत शहरात येणाऱ्या अवैध गुटख्याच्या गोडाऊनवर छापा टाकला आहे. या कारवाईत तब्बल 81 लाख 44 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. वाळूज परिसरातील साजापूरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याबाबत पोलीस उपआयुक्त अपर्णा गिते यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर एवढ्या मोठ्याप्रमाणात गुटख्याचा साठा गोडाऊनमध्ये ठेवलेला असताना, स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती कशी मिळाली नाही? असा प्रश्न पोलीस उपआयुक्तांच्या या कारवाईनंतर उपस्थित होत आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज एमआयडीसी येथील साजापुरच्या गट नंबर 58/पी  इपका कंपनीचे बाजुला एका गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त अपर्णा गिते यांना खबऱ्याकडून मिळाली. माहिती मिळताच गीते यांनी दोन पंचासह पोलिसांचे पथक तयार करून घटनास्थळी छापा टाकला. पोलीस आल्याची माहिती मिळताच गोडाऊनमध्ये असलेल्या व्यक्तींनी मागच्या छुप्या मार्गाने पळ काढला. मात्र या कारवाईत पोलिसांनी गुटख्यासह तब्बल 81लाख 44  लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्यात महाराष्ट्र शासनाने बंदी केलेला गोवा 1000 गुटखा, गोवा 1000 पान मसाला, व G-1 जर्दा असे एकुण 41 लाख 44 हजार 20 रुपयांचा  एकुण 67 मोठ्या गोण्यामध्ये भरलेला गुटखा जप्त केला आहे. तर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी वर्षा तारांचंद रोडे  यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अशी झाली कारवाई! 



  • गोवा गुटखा, गोवा पान मसाला व G-1 जर्दा असा एकूण 41 लाख 44 हजार 20 रुपये किंमतीचा एकुण 67 मोठ्या गोण्या

  • एक अशोक लेलॅन्ड कंपनीचा ट्रक (क्रमांक KA56 6330) ज्याची किंमत 25 लाख रुपये

  • एक अशोक लेलॅन्ड कंपनीची पिकअप (क्रमांक MH-20- EG-6038) ज्याची किंमत 5 लाख रुपये

  • एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार (क्रमांक MH-37-V- 9995) ज्याची किंमत 5 लाख

  • एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार (क्रमांक MH-14-FX- 3832) ज्याची किंमत 5 लाख


यांनी केली कारवाई!


ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती अपर्णा गिते, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, औरंगाबाद शहर यांच्या सुचनेप्रमाणे गुन्हे शाखेचे सपोनि  मनोज शिंदे, सपोनि काशिनाथ मांडुळे, व सायबर चे पोउपनि राहुल चव्हाण, पोअं. अमोल देशमुख, गुन्हे शाखेचे अंमलदार चंद्रकांत गवळी, विलास मुटे, विशाल पाटील, राजाराम डाकुरे, भगवान सिलोटे, तात्याराव शिनगारे सर्व गुन्हे शाखा औरंगाबाद यांच्या पथकाने सदरची कामगिरी केलेली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा; परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस आयुक्तांचं आवाहन