Chhatrapati Sambhaji Nagar News : महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत आज सकाळी शहरातील मुख्य बाजारपेठ रंगार गल्ली, पैठणगेट, सिटी चौक, औरंगपुरा या परिसरात कारवाई करण्यात आली आहे. शहरात साजऱ्या होणाऱ्या 14 एप्रिल, गुड फ्रायडे, हनुमान जयंती उत्सव व रमजान ईदच्या निमित्ताने सणासुदीच्या काळात शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. या गर्दीच्या ठिकाणी काही दुकानदारांनी आणि हातगाडी धारकांनी केलेले अतिक्रमण आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) वतीने मोहीम राबवून काढण्यात आला आणि रस्ता मोकळा करण्यात आला.
हातगाडी चालक व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर हात गाडी लावून रस्त्यावर व्यापार करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतोच आणि व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर लावल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याने आपसात तणाव होतो. यामुळे अनकेदा भांडण देखील होतात. त्यामुळे महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत आज सकाळी कारवाई करण्यात आली. प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या सूचनेनुसार मा. अतिरिक्त आयुक्त-2 यांचे सोबत सोमवारी स्थळ पाहणी करुन संबंधित अतिक्रमण धारकांना सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु आज पुन्हा त्यांनी अतिक्रमण केल्याने पैठण गेट, रंगार गल्ली, सिटी चौक या परिसरात कारवाई करण्यात आली.
'या' भागात देखील केली कारवाई...
यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत पैठण गेट ते सब्जी मंडी या रस्त्यावर चार फळ आणि फूल झाडे विक्रेते दुकानांना तीन दिवसाची मुदत देण्यात आली आहे. त्यांच्यावर सोमवारी कारवाई होणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी दिली आहे. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने टीव्ही सेंटरच्या एम-2 परिसरातून चारचाकी वाहने, हातगाड्याचे अतिक्रमण काढले. तर शरद हॉटेल ते जिजाऊ चौक जयस्वाल हॉल पर्यंत पाहणी करून रस्त्यावर आलेल्या अतिक्रमणधारकांना मार्किंग करुन दिली आहे. तसेच या ठिकाणी गुरुवारी सकाळी कारवाई होणार आहे.
यांनी केली कारवाई...
ही कारवाई प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त-2 तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे इमारत, निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे, यांच्या पथकाने कारवाई केली अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत होणार