Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) सोयगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मजुरीच्या कामावरून पायी घरी जाणाऱ्या पिता-पुत्रावर मधमाश्यांनी हल्ला केल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. सोयगाव तालुक्यातील शिंदोल शिवारात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, ज्यात वडिलांचा मृत्यू झाला असून, मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे. सय्यद सबदर सय्यद इस्माईल (वय 58 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, आबिद सय्यद सबदर असे त्यांच्या जखमी मुलाचे नाव आहे.  


जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगर देवळा येथील सय्यद सबदर सय्यद इस्माईल व त्यांचा मुलगा आबिद सय्यद सबदर हे सोयगाव तालुक्यातील शिंदोल शिवारात मजुरीच्या कामासाठी शुक्रवारी आले होते. काम करून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ते घराकडे परतत असताना शिंदोल गावाजवळ एका अज्ञात व्यक्तीने मधमाश्यांना डिवचल्याने मधमाश्यांनी या बापलेकावर हल्ला केला. यात सैयद सबदर सैयद इस्माईल यांच्या तोंडावर, डोक्यात आणि हातपायांवर मधमाशांनी जोरदार डंख मारले. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर मुलगा आबीद सय्यद सबदर यालाही मधमाशांनी डंख मारून गंभीर जखमी केले. त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. मयत सय्यद सबदर सय्यद इस्माईल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.


अज्ञात व्यक्तीने मधमाश्यांना डिवचल्याने हल्ला...


दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगर देवळा येथील सय्यद सबदर सय्यद इस्माईल व त्यांचा मुलगा आबिद सय्यद सबदर हे मजुरीच्या कामासाठी सोयगाव तालुक्यातील शिंदोल शिवारात आले होते. काम संपल्याने ते घराकडे निघाले होते. मात्र याचवेळी रस्त्याने असलेल्या मधमाश्यांच्या पोळीवर अज्ञात व्यक्तीने काही तरी फेकून मारत त्यांना डिवचले. त्यामुळे पोळीवर बसलेला मधमाश्यांच्या झुंड अचानक रस्त्यावर आला. याचवेळी तेथून जाणाऱ्या  सय्यद सबदर व त्यांचा मुलगा आबिद सय्यद यांच्या मधमाश्यांनी हल्ला केला. हा हल्ला एवढा भीषण होता की,  सय्यद सबदर तोंडावर, डोक्यात आणि हातपायांवर मधमाशांनी जोरदार डंख मारले. त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला आणि त्यात त्यांच्या मृत्यू झाला. 


तर त्यांच्यासोबत असलेला त्यांच्या मुलगा आबिद सय्यद याला देखील मधमाश्यांनी चावा घेतल्याने तो यात गंभीर जखमी झाला. यावेळी तेथून जाणाऱ्या इतर नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तत्काळ जखमी पिता-पुत्राला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सय्यद सबदर यांना मृत घोषित केले. तर त्यांच्या मुलावर उपचार करण्यात येत आहे. पण एका अज्ञात व्यक्तीच्या चुकीमुळे  सय्यद सबदर यांना जीव गमवावा लागला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


एसआयडीच्या इशाऱ्यानंतरही छ. संभाजीनगरात दंगल, दंगलीची इनसाईड स्टोरी 'माझा'वर