Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या सभेला येणाऱ्या गाड्याप पोलिसाकडून अडवल्या जात असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. सोबतच दानवे यांनी भर सभेतून पोलिसांना दम भरला. पोलिसांना मस्ती आली आहे का?, आजचा दिवस तुमचा असून, उद्या आमचा असेल. त्यामुळे पोलिसांनी सरकारच्या नादी लागू नयेत असे दानवे म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, पोलिसांसोबत बैठकीत शहरातील जुबली पार्कपर्यंत गाड्या सोडण्याचं ठरले होते. मात्र बाबा पेट्रोलपंपावर आठशे पेक्षा अधिक गाड्या पोलिसांनी अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सरकारच्या नादी लागून, जास्त मस्ती करू नये. आजचा दिवस तुमचा असून, उद्यापासून आमचा असेल. कारण सगळ्या गाड्या मुद्दामहून अडवले जात आहे. त्यामुळे पोलिसांना मस्ती आली असेल तर ती जिरवून दाखवू असा दम दानवे यांनी भरला. अडवलेल्या गाड्या पटकन सोडा अशी मागणी देखील दानवे यांनी केली.
खैरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका...
दरम्यान, यावेळी सभेत बोलताना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका केली. आज होणारी महाविकास आघाडीची सभा होऊ नयेत म्हणून खूप प्रयत्न करण्यात आले. भाजप आणि एमआयएमकडून शहरातील परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आज स्वा. सावरकर यांची न जयंती आहे ना पुण्यतिथी, तरीही भाजप आणि शिंदे गटाचे लोकं यात्रा काढत आहे. तर सकाळी गौरव यात्रा काढता आली असती, मात्र पोलिसांनी संध्याकाळीची काढण्यात येत आहे. तर पोलिसांनी देखील या यात्रेला संध्याकाळची परवानगी का दिली? असा सवाल खैरे यांनी उपस्थित केला. तर आमच्या सभेला लोकं येऊ नयेत म्हणून, त्यांच्या गाड्या अडवल्या जात असल्याची टीका खैरे यांनी केली आहे.
धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल...
सभेत बोलताना धनजय मुंडे म्हणाले की, 6 एप्रिल हा भाजपचा स्थपना दिवस आहे. पण वज्रमुठच्या सभेनंतर1 एप्रिल भाजपाचा स्थपना दिवस म्हणून साजरा होईल. तर भाजपाच्या कमळाचा फुल म्हणजे एप्रिल फुल असल्याच मुंडे म्हणाले. तर महाविकास आघाडीची सभा क्रांतिकारी मराठवाड्यात होत आहे. मात्र सभेची तारीख ठरली त्यानंतर ते यात्रा काढली जात आहे. विशेष म्हणजे हे लोकं एवढे घाबरून गेले आहेत की, जिथे-जिथे महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार तिथे-तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता कोणता कार्यक्रम घेणार असल्याचा टोला धनंजय मुंडे यांनी यावेळी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या: