Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) तब्बल 166 किलो वजन असलेल्या एका महिलेवर शासकीय घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करुन दाखवली आहे. 166 किलो वजन असलेल्या 32 वर्षीय महिलेवर हर्नियाची शस्त्रक्रिया ओढावली. खासगी रुग्णालयांनी नकार दिला असताना छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालयाने मात्र हे आव्हान स्वीकारले. परंतु, अतिलठ्ठपणा आणि हायपोथायरॉईडिझममुळे शस्त्रक्रिया करणे अवघड होते. सोबतच शस्त्रक्रियेनंतर रक्ताची गाठ होणे, न्यूमोनिया, टाके तुटण्याची भीतीही होती. मात्र ही सगळी आव्हाने स्वीकारुन घाटीतील शल्यचिकित्साशास्त्र विभागाने 29 मे रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. 


जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय आणि 166 किलो वजन असलेली महिला घाटी रुग्णालयातील अपघात विभागात दाखल झाली. सोबत महिला 27 मे रोजी गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. दरम्यान यावेळी तिच्यासोबत नातेवाईक होते. तिच्यावर हर्नियाची (एपिगॅस्ट्रिक हर्निया) शस्त्रक्रिया करणे गरजेची होती. परंतु अतिलठ्ठपणा, हायपोथायरॉइडिझममुळे शस्त्रक्रिया करणे अवघड आणि काहीसे धोकादायक होते. विशेष म्हणजे खाजगी रुग्णालयाने ही शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता. मात्र शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारले. एवढच नाही तर महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया देखील केली. 


अशी पार पडली शस्त्रक्रिया...



  • अशा अवस्थेत शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर रुग्ण भुलीतून लवकर परत येत नाही.

  • शिवाय शस्त्रक्रियेनंतर रक्ताची गाठ होणे, न्यूमोनिया, टाके तुटण्याची भीतीही होती.

  • अतिलठ्ठपणा आणि हायपोथायरॉइडिझममुळे शस्त्रक्रिया करणे अवघड होते.

  • खाजगी रुग्णालयाने देखील ही शस्त्रक्रियेसाठी नकार दिला होता.

  • मात्र शासकीय घाटी रुग्णालयाने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान स्वीकारले.

  • रुग्णाचा रक्त्तदाब पाहण्यासाठी मोठ्या आकाराचा बीपी कफ मशीन मागवण्यात आले.

  • रुग्णाला वॉर्डातून शस्त्रक्रियागारात हलवण्यासाठी आणि परत वॉर्डात आणण्यासाठी मोठ्या आकाराची ट्रॉली मागवण्यात आली.

  • रुग्णाच्या पाठीत भुलीचे इंजेक्शन देण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त लांबीची सुई मागवण्यात आली.


आव्हाने स्वीकारुन केली शस्त्रक्रिया


तब्बल 166 किलो वजन असलेल्या 32 वर्षीय महिलेवर शल्यचिकित्साशास्त्र विभागाने 29 मे रोजी सर्व आव्हाने स्वीकारुन शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे यावेळी महिलेची शरीरयष्टी पाहता दोन ओटी टेबल जोडून महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी घाटीतील रोजी अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर, डॉ. सरोजनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जुनेद शेख, डॉ. आरीफ काझी यांनी शस्त्रक्रिया केली. डॉ. रश्मी बंगाली, डॉ. ज्योती कुलकर्णी, डॉ. अश्विनी सोनटक्के यांनी भूल दिली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठवाड्यातील बाळांसाठी आईच्या दुधाची पहिली बँक छत्रपती संभाजीनगरमध्ये; नवजात शिशूंसाठी ठरणार नवसंजीवनी