Chhatrapati Sambhaji Nagar News : आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आज हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने कोल्हापुरात सद्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूरातील  हिंसाचाराची परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगर पोलीस अलर्ट झाली आहे. तर जिल्ह्याभरातील सर्वच पोलीस ठाणेप्रमुखांना पेट्रोलींग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच सोशल मिडीयावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देखील वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. 


कोल्हापूर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर याचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत याची खबरदारी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून घेण्यात येत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी सर्वच ठाणेप्रमुखांना ग्रुप कॉलिंगवर विशेष सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यात सर्वत्र पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर आपापल्या पोलीस ठाणे हद्दीत विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच सोशल मिडीयावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोल्हापूर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सर्वांना अलर्ट राहण्याच्या सूचना देखील कलवानिया यांनी दिल्या आहेत. 


कोल्हापुरात आज नेमकं काय घडलं? 


कोल्हापूर जिल्ह्यातील काही विशिष्ट समाजातील तरुणांनी काल औरंगजेब आणि टेपू सुलतानचे स्टेट्स सोशल मिडीयावर ठेवले होते. त्यामुळे यावरून हिंदुत्ववादी संघटनेचे काही कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या समोर जमा झाले. तसेच आरोपींना अटक करण्याची मागणी करू लागले. दरम्यान याचवेळी एका गटाने एका विशीष्ट समाजाच्या वस्तीवर दगडफेक केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर आज पुन्हा हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती. दरम्यान यावेळी मोठा जमाव जमा झाला.  तसेच काही वेगवेगळ्या भागात दगडफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. 


इंटरनेट बंद करण्याच्या हालचाली सुरु... 


दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरात सद्या तणावपूर्ण वातावरण आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत पोलिसांची बैठक होणार असून, ज्यात शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सद्या शहरात अनेक अफवा पसरवल्या जात आहे. तसेच काही व्हिडिओ देखील व्हायरल होतायत आहे. त्यामुळे हे सर्व रोखण्यासाठी शहरातील इंटरनेट बंद करण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sharad Pawar on Kolhapur: जे घडत आहे ते एकट्याचे काम नाही, अशा प्रवृत्तींना सत्ताधारी प्रोत्साहन देतोय, कोल्हापुरातील प्रकारावरुन शरद पवारांचा गंभीर आरोप