SSC Exam Copy  In Chhatrapati Sambhajinagar: दहावी बोर्डाच्या परीक्षेला (SSC Exam) आजपासून (2 मार्च) सुरुवात झाली असून, यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. दहावी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. मात्र असे असताना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील पैठणमध्ये खुलेआम कॉपीचे प्रकार समोर आले आहेत. शाळेच्या इमारतीवर चढून वर्गाच्या खिडकीतून मुलं कॉपी पुरवत असल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कॉपी मुक्त अभियानाला हरताळ फासल्याचे समोर आले आहे. 


दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरवात झाली. आज मराठी विषयाचा पहिला पेपर झाला. मात्र याचवेळी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरातील मिश्रीलाल पहाडे जैन इंग्लिश स्कूलमध्ये कॉपी पुरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी काही तरुण शाळेच्या इमारतीवर चढून, खिडकीतून आतमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत होते. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. तर या ठिकाणी लहान मुलं देखील कॉपी पुरवण्यासाठी आल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील अशाप्रकारे सर्रासपणे कॉपी पुरवल्या जात असल्याचे दिसून आले. 


पोलिसांसमोर कॉपीचे प्रकार


दरम्यान आजपासून सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेत कॉपी सारखे प्रकार घडू नयेत म्हणून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठ पथक तैनात करण्यात आले आहे. सोबतच शाळेच्या बाहेरून कॉपी पुरवली जाण्याची शक्यता असल्याने प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. मात्र असे असताना पैठणमध्ये बिनधास्तपणे कॉपी पुरवल्या जात असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे काही लोकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचं देखील आरोप होत आहे. 


विभागातील आकडेवारी! 


पासून सुरु झालेल्या बोर्डाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला छत्रपती संभाजीनगर विभागातून तब्बल 1 लाख 80 हजार 210 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. ज्यात 2 हजार 614 शाळांतील 99 हजार 549 विद्यार्थी तसेच 80 हजार 661 विद्यार्थिनीचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 227 परीक्षा केंद्रावर एकूण 64 हजार 593 विद्यार्थी परीक्षा देत असून, बीडमध्ये 156 केंद्रावर एकूण 41 हजार 521, जालना जिल्ह्यातील 93 परीक्षा केंद्रावर 27 हजार 800, परभणीत 100 परीक्षा केंद्रावर 30 हजार 676 आणि हिंगोली जिल्ह्यातील 53 परीक्षा केंद्रावर 15 हजार 620 विद्यार्थी परीक्षा देत आहे.                 


इतर महत्वाच्या बातम्या: 


SSC Exam : छ. संभाजीनगर विभागात 629 केंद्रांवर 1.80 लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI