छत्रपती संभाजीनगर : पुणे आणि अहमदाबाद डीआरआय (Pune DRI) विभागाने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरामध्ये मोठी कारवाई केली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केलेत. दरम्यान हे अंमली पदार्थ 500 कोटी रुपयांचे असल्याची चर्चा सध्या आहे. परंतु अधिकाऱ्यांकडून अद्याप याला कोणताही दुजोरा देण्यात आला नाही. तसेच या प्ररकणात दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जितेशकुमार हिनोरीया प्रेमजीभाई आणि संदीप शंकर कुमावत असं या आरोपींची नावे आहेत. 


राज्यात सध्या अंमली पदार्थांविरोधात मोठ्या कारवाईंचं सत्र सध्या पोलीस प्रशासनाकडून सुरु आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्येही ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईमध्ये कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईमध्ये 40 किलो कोकेन, 32 लाख रोख रुपये पोलिसांना त्यांच्या घरातून मिळाले आहेत. तर गुजरातवरुन हे अंमली पदार्थ आणले जात असल्याची माहिती सध्या समोर येतेय. तिथून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अंमली पदार्थ वितरित केले जायचे. 


यामधील एका आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर या आरोपीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आलेत. तर यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत, ते म्हणाले होते आम्ही यामधील संबंधित आरोपींची नावे सांगू,त्याचं काय झालं. तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, पोलिसांना कसलीचा माहिती नाही, सरकार झोपलेलं आहे आणि बाहेरच्या राज्यातील पोलीस येऊन ही कारवाई करतात. 


हेही वाचा : 


Nashik News : इन्स्टाग्रामवरून ओळख, पुढे मैत्री अन् प्रेमाचा बनाव, पण नंतर तरुणीसोबत घडलं भलतंच, नाशिकमधील प्रकार