Chhatrapati Sambhaji Nagar News: दिवसेंदिवस माणुसकी हरवत चालली असल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. तर अनकेदा अपघातात जखमी व्यक्तीला मदत करण्यापेक्षा काहीजण मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात समाधान मानतात. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) असाच काही संतापजनक प्रकार समोर आला आहे. अपघातात (Accident) जखमी महिलेला मदत तर केलीच नाही, पण तिच्या अंगावरील मंगळसूत्र लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी अपघातात जखमी झालेल्या महिलेच्या गळ्यातील मणी गंठण जमावातील अज्ञात चोरटयाने लांबविले आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, बजाजनगर परिसरातील म्हाडा कॉलनीतील बिल्डींग नंबर 5 मध्ये राहणारे रंजीव राजन कल्याणकर हे मंगळवारी (21 मार्च) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पत्नी सोबत स्कुटीवर (क्र. एमएच- 13 सीपी 2605)  बसुन प्रतापचौक येथील पोस्ट ऑफिस येथे कामानिमित्त गेले होते. दरम्यान काम झाल्यावर ते परत घराकडे निघाले होते. मात्र क्रांतीचौक रस्त्यावर आम्रपाली बौद्ध विहारासमोरील रस्त्यावर त्यांच्या मोपेडला एका दुचाकीस्वाराने भरधाव व निष्काळजीपणे चालवून धडक दिली. 


गळ्यातील मणी गंठण जमावातील अज्ञात चोरटयाने लांबविले


दुचाकीस्वाराने धडक दिल्याने कल्याणकर यांची पत्नी खाली पडून जखमी झाल्यात. हे पाहून घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमा झाली. याचा फायदा उचलत अज्ञात चोरटयाने त्याच्या गळयातील 41 हजार रूपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण लांबविले. काही वेळाने ही बाब त्यांच्या पत्नीच्या लक्षात आली. त्यामुळे कल्याणकर यांनी तत्काळ पत्नीसह क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिला पोलिस हवालदार चांदे या तपास करीत आहेत.


रिक्षाने प्रवास करताना वृद्धाचे सव्वा दोन लाखाचे दागिने लंपास


दुसऱ्या एका घटनेत रिक्षाने प्रवास करीत असताना एका सेवानिवृत्त वृद्धाचे सव्वा दोन लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोराने लंपास केल्याचा गुन्हा सिडको पोलिसात दाखल करण्यात आला आहे.  सिडको बसस्थानक ते आंबेडकरनगर दरम्याने ही घटना घडली आहे. परभणी जिल्हयातील शिवराम नगर येथे राहणारे प्रमोद रामचंद्र भरड ( ह. मु. तेजल संस्कृती अपार्टमेंट, पिसादेवी) हे सिडको बसस्थानक येथून आंबेडकरनगर चौकाकडे रिक्षाने येत होते. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या सह प्रवाश्यापैकी कोणीतरी त्यांची नजर चुकवून भरड यांची बॅग लांबविली. या बॅगेत 40  हजार रूपये किमतीची सोन्याची जोंधळी माळ, 50 हजार रूपये किमतीच्या पाच अंगठया, 90 हजार रूपये किमतीचे सोन्याचे कानातील नऊ जोड, 30 हजार रूपये किमतीचे मणीमंगळसुत्र व रोख दहा हजार रूपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


धक्कादायक! कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात शेतकरी दांपत्याची आत्महत्या